Crime News esakal
मराठवाडा

Hingoli Crime| वसमतमध्ये महिलेवर तलवारीने वार, अकरा जणांवर गुन्हा दाखल

वसमतमध्ये महिलेवर तलवारीने वार

पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : वसमत शहरातील मुस्कान फंक्शन हॉलच्या मागे एका महिलेवर तलवारीने वार करून जखमी करणाऱ्या अकरा जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.सहा) सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत (Vasmat) शहरातील मुस्कान फंक्शन हॉलच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योती कदम यांचा भाऊ प्रेम व त्याच भागात राहणारा शेख सरफराज याचे मामा चौकात भांडण झाले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.पाच) रात्री पुन्हा हा वाद उफाळून आला. शाब्दिक चकमकीनंतर मारहाणीला सुरुवात झाली. (Some People Attacks With Sword On Woman In Vasmat Of Hingoli)

यावेळी अकरा जणांनी ज्योती कदम यांना तुम्ही येथे का राहाता या ठिकाणी धार्मिकस्थळ बांधायचे आहे, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने वार केले. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सदरील भांडण सोडवण्यासाठी काही जण मध्ये पडले असता त्यांच्यावर ही तलवारीने वार करण्यात आले. या प्रकरणात ज्योती कदम यांनी आज पहाटे वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख फिरोज, शेख असिफ, शेख सोनू, शेख सरफराज, शेख सोहेल, शेख चाऊस यांच्यासह पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सोबतच आर्म्स एक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस उपअधीक्षक किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT