शेवंताबाई सावळकर व त्रिवेणाबाई सोनवणे या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. 
मराठवाडा

सख्ख्या वृद्ध बहिणींचा जावयाकडून खून,मृतदेह पोत्यात बांधून पुरले

विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी (जि.लातूर) : गोटेवाडी शिवारातून (Ausa) महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या वृद्ध बहिणींचा खून झाल्याचे गुरुवारी (ता.१२) पोलिस तपासात (Crime In Latur) उघड झाले. दोघींचेही मृतदेह पोत्याच्या गाठोड्यात बांधून दफन केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यावर गाय पुरलेली होती. जावयाने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवंताबाई ज्योतिबा सावळकर वय (वय ८२, रा. लामजना, ता. औसा) आणि त्रिवेणाबाई सगन सोनवणे (वय ८५) अशी मृतांची नावे आहेत. शेवंताबाई आणि त्रिवेणाबाई या गोटेवाडी शिवारातील शेतात राहत होत्या. दोघींच्याही जमिनी जवळच होत्या. सात जुलैपासून दोघी अचानक बेपत्ता झाल्या. त्यांच्या घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे त्रिवेणाबाई यांचा मुलगा अॅड. नवनाथ सोनवणे याने किल्लारी पोलिस ठाण्यात (Killari Police Station) आई व मावशी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी तपास केला. शेवंताबाई यांचा जावई राजू ऊर्फ त्र्यंबक गुरसिद्ध नारायणकर (५५, रा. लामजना) याच्यावर पोलिसांना संशय होता. तो मुंबई येथे त्याच्या मुलीकडे गेला. किल्लारी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला मुंबईत ताब्यात घेतले. शेतजमीन नावावर करून दिली नसल्याने शेवंताबाई यांचा त्याने खून केला. दरम्यान, त्रिवेणाबाई या बहिणीला वाचवायला गेल्या असता त्यांनाही राजूने ठार मारल्याची कबुली दिली. किल्लारीचे पोलिस निरीक्षक अमोल गुंडे, बिट जमादार सचिन उस्तुर्गे, पोलिस हेडकॉन्स्टेबल आबासाहेब इंगळे यांनी ही कारवाई केली.

तुकडे करून पुरले

शेवंताबाई यांना मुलगा नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची शेतजमीन जावई राजू याच्या नावावर न करता मुलीच्या म्हणजेच राजूच्या पत्नीच्या नावार केली. त्याचा राजूला राग होता. राजूने कोयत्याने शेवंताबाई यांच्यावर वार केले. त्यांना वाचवण्यासाठी त्रिवेणाबाई गेल्या असता त्यांनाही राजूने ठार मारले. नंतर दोघींचे तुकडे करून गाठोडे करून शेततळ्यातील पाळूच्या खपारीत पुरले. शंका येऊ नये म्हणून त्यावर गाय पुरली. पोलिसांनी शेततळ्यातील पाणी बाहेर काढून खोदकाम केले व गुरुवारी मृतदेह बाहेर काढले.

बेपत्ता महिलेचा दाखल गुन्ह्यातील कलम ३६४ प्रमाणे होणाऱ्या तपासात ३०२ चे कलम वाढवून संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- सुनील गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, किल्लारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT