Navnath Sankpale sakal
मराठवाडा

Navnath Sankpale : शेतमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा झाला फौजदार..!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तिसऱ्या प्रयत्नात यश.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - शेतात काबाडकष्ट करून शेतमजूर करीत आपल्या मुलाला उच्च शिक्षण देत फौजदार बनविण्याची किमया फुलंब्री येथील द्रोपदाबाई संकपाळे या महिलेने करून दाखवली आहे. नवनाथ विश्वनाथ संकपाळे या 27 वर्षीय मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झाली आहे.

ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची परिस्थिती अत्यंत बिकट असूनही उच्चशिक्षिन देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचे असतात. त्याचबरोबर त्यांच्या आई-वडिलांची ही त्यात मोठा सिंहाचा वाटा असतो. फुलंब्री येथील शेतात मजुरी करणारी द्रोपदाबाई विश्वनाथ शंकरपाळे यांनी आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट केले. घरची परिस्थिती हलकीच्या असताना शेतमजुरी करून नवनाथ संकपाळे याचे शिक्षण पूर्ण केले.

नवनाथ संकपाळे याचे 2013 मध्ये जिल्हा परिषद शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर 2015 मध्ये पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बीएससी ची पदवी नवनाथ संकपाळे याने पूर्ण केली. आतापर्यंत नवनाथ संकपाळे याने दोन वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली मात्र त्यात अपयश आले.

अपयशाला न घाबरता जिद्ध आणि चिकाटी वापरून आईंच्या परिश्रमाचे चीज करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरीक्षक तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. नवनाथ संकपाळे याचा भाऊ सागर संकपाळे या चहा हॉटेल चालवितो. तर राणी हीचे लग्न झालेले आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदी नवनाथची निवड झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याबद्दल त्याचा गावकऱ्यांच्या वतीने सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, पीएसआय श्रीनिवास धुळे, योगेश मिसाळ, गणेश राऊत, सुमित प्रधान, विशाल आढाव यांच्यासह आदींनी सत्कार केला.

..अन् तिचे डोळे पाणवले

द्रोपदाबाई विश्वनाथ संकपाळे यांनी मुलाच्या शिक्षणासाठी शेतमजुरी करीत शिक्षण पूर्ण केले. दोन वेळेस अपयश आल्यानंतरही नवनाथला धीर देत पुढे पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी पाठिंबा दिला. नवनाथ ने ही रात्रंदिवस अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात यश मिळविले. त्याचे आता पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. ही बातमी कळताच नवनाथची आई द्रोपदाबाई संकपाळे यांचे डोळे आनंद अश्रुने पाणवले होते.

भाड्याच्या रूममध्ये केला अभ्यास

घरामध्ये स्वतंत्र रूम सुस्थितीत नसल्यामुळे अभ्यास करताना नवनाथ संकपाळे याला अडचणी निर्माण होत होत्या. शेवटी फुलंब्री नगरपंचायत परिसरात एक स्वतंत्र रूम भाड्याने घेऊन नवनाथ संकपाळे हा मागील गेल्या दोन वर्षापासून सातत्याने अभ्यास करीत होता. आईच्या कष्टाचे चीज करण्यासाठी तो अहोरात्र अभ्यासासाठी मेहनत घेत होता. रात्रंदिवस अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास केल्यामुळे नवनाथ संकपाळे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याने याला यश मिळाले आहे.

महाराष्ट्र लोक आयोगाच्या तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळाले आहे. दोन वेळेस अपयश मिळाले तरी खचून न जाता आईने धीर देत पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी पाठिंबा दिला. वडिलांची इच्छा होती मी अधिकारी व्हावं. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवून कुठल्याही गोष्टीत खचून न जाता अभ्यास केल्याने यश नक्कीच मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.

- नवनाथ संकपाळे, पोलीस उपनिरीक्षक निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT