south central railway special train for ayodhya on 4th february hingoli esakal
मराठवाडा

Ayodhya Ram Mandir : दक्षिण मध्य रेल्वेतर्फ 4 फेब्रुवारीला मराठवाड्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे

दक्षिण मध्य रेल्वेतर्फ चार फेब्रुवारीला अयोध्येसाठी जालना-पूर्णा- नांदेड-चंद्रपूर- नागपूर मार्गे एक फेरी, १४ फेब्रुवारीला नांदेड- पूर्णा - जालना- छत्रपती संभाजीनगर- मनमाड मार्गे एक फेरी तर १८ फेब्रुवारीला सिंकदराबाद- नांदेड - हिंगोली - अकोला - खंडवामार्गे एक फेरी अयोध्याधाम विशेष रेल्वे धावणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : दक्षिण मध्य रेल्वेतर्फ चार फेब्रुवारीला अयोध्येसाठी जालना-पूर्णा- नांदेड-चंद्रपूर- नागपूर मार्गे एक फेरी, १४ फेब्रुवारीला नांदेड- पूर्णा - जालना- छत्रपती संभाजीनगर- मनमाड मार्गे एक फेरी तर १८ फेब्रुवारीला सिंकदराबाद- नांदेड - हिंगोली - अकोला - खंडवामार्गे एक फेरी अयोध्याधाम विशेष रेल्वे धावणार आहे.

या रेल्वे अयोध्येमधून परतीचा प्रवासासही करणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या गाड्यांना २२ डबे असतील. सिंकदराबाद- अयोध्याधाम (रेल्वे क्रमांक ०७२९७) एक दिवसीय विशेष रेल्वे १८ फेब्रुवारीला हिंगोली येथे रात्री ११.२० ला पोचेल. वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, झांसी, कानपूर, लखनऊ मार्ग २० फेब्रुवारीला पहाटे ३.३५ ला अयोध्याधाम येथे पोचेल.

परतीच्या प्रवासासाठी ती (०७२९७) अयोध्याधाम येथून २१ फेब्रुवारीला दुपारी २.२० ला सुटेल. हिंगोली येथे २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.१३ ला येईल. वसमत,

पूर्णा, नांदेड, बासर, निजामाबाद, कामारेड्डी मार्गे ती सिंकदराबादला २३ फेब्रुवारीला सकाळी ९.१५ ला पोचेल. स्टेशन मास्टर रामसिंग मीना व मनोज घाघरे यांनी ही माहिती दिली.

हिंगोली मार्गे अयोध्याधाम विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याने खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, बाबाराव बांगर, दिलीप चव्हाण, धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू, डॉ. निलावार, प्रवीण पडघन आदींनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT