file photo 
मराठवाडा

Video: चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करा ः शास्त्रज्ञ डॉ. यू. एन. आळसे

कैलास चव्हाण

परभणी : मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर होणार आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसाची दररोज हजेरी लागत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकासाठी ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास फायदेशीर राहील. तसेच चांगला पाऊस झाला तरच पेरणी करा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे व्यवस्थापक तथा शास्त्रज्ञ डॉ. यू. एन. आळसे यांनी दिला आहे.

सध्या मान्सूनपूर्व पावसाने आगमन झाले आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊसदेखील लवकर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मोंढ्यात येऊन खत, बियाणांची खरेदी करू लागले आहेत. तसेच पेरणीपूर्व अंतिम मशागतीलादेखील गती आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके कोणते बियाणे वापरावे, कृषी विद्यापीठाने कोणते बियाणे संशोधित करून पेरणीसाठी शिफासर केले आहे याविषयी कृषी शास्त्रज्ञ डॉ. यू. एन. आळसे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला आहे. ते म्हणाले, ‘‘पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अवश्यक आहे. 
त्यासाठी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी ट्रायकोडरमा (जैविक), थायरम किंवा कार्बेन्डेंझिम २-२.५ ग्राम/ कि बियाणेआदी बुरशीनाशकाचा वापर करावा.’’


हेही वाचा : ​राज्यातील सरपंचांना मिळाला मोठा दिलासा...असे ते वाचा

पेरणीसाठी हे बियाणे वापरा
सोयाबीन पिकामध्ये एमएयूएस- ७१, एमएयूएस- १५८, एमएयूएस-१६२, ६१२ अशा वाणांची निवड करावी. १६२ हे वाण यंत्राद्वारे काढणीसाठी उपयुक्त असून पक्वतेनंतर दहा ते १२ दिवस शेंगा फुटत नाही. तुरीच्‍या अधिक उत्‍पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. पेरणीसाठी  बीडीएन - ७११, बीएसएमआर - ८५३, बीएसएमआर - ७३६, बीडीएन - ७१६ या वाणांची निवड करावी. यातील ७११ हे वाण कमी कालावधीत येणारे आहे. मूग लागवडीसाठी बीएम- ४, कोपरगाव, बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-१-१, बीएम-२००३-२, फुलेमूग-२, पीकेव्‍हीएकेएम-४ या वाणांची, तर उडीद लागवडीसाठी बीडीयू-१, टीएयू-१, टीपीयू-४ या वाणांची निवड करावी. मका पिकाच्‍या लागवडीसाठी नवज्‍योत, मांजरा, डीएमएच-१०७, केएच-९४५१, एमएचएच, प्रभात, करवीर, राजर्षी, महाराजा आदी वाणांची निवड करावी. बाजरीमध्ये एएसबी १२००, एएसबी १२६९, एआयएमपी (समृद्धी), पीपीसी (परभणी संपदा), एबीपीसी ४-३ हे वाण निवडावे.

हेही वाचा : Video : परभणीत व्यापाऱ्यांची शक्कल; दुकानांसमोर दोऱ्यांचे जाळे !

‘बीबीएफ’ टोकण यंत्राचा वापर करा
‘बीबीएफ’ टोकण यंत्राच्या सहाय्याने पेरलेल्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा ओलावा जास्त काळा टिकून राहतो व झाडांची वाढ चांगली होते. या पद्धतीमुळे अतिरिक्त झालेले किंवा जास्त पडलेले पावसाचे पाणी रुंद वरंब्यातून सरीद्वारे शेतातून बाहेर निघून जाते व योग्य प्रमाणात पडलेला पाऊस जमिनीत मुरतो. या यंत्रणेद्वारे मृत व जलसंधारण होते. या ट्रॅक्टरचलित टोकण यंत्रामुळे पेरणी कमी वेळात होते. योग्य प्रकारे दोन ओळींतील अंतर ठेवल्यास आंतरमशागतही करता येते. या सरी वरंबा पद्धतीत पेरणी केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनामध्येही पांरपरिक पद्धतीपेक्षा १५ ते २० टक्यांनी वाढ होते. सुरक्षित बेरोजगार तरुणांना उत्पादनाचे साधन म्हणून वापरता येते.

बीबीएफ यंत्र आहे तरी काय?
रुंग वरंबा सरी (बीबीएफ) म्हणजे ब्रॉड बेस फरो टोकण यंत्राद्वारे रुंद वरंबा व सरी तयार करून त्यावर विविध पिकांची पेरणी करता येते. यामध्ये सरी पाडण्यासाठी दोन बाजूला दोन रिजर दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या व खोलीच्या सऱ्या पाडता येता. साधारणपणे ३०,४०,६० सेमी रुंद आणि दहा व २० सेमी खोलीच्या सऱ्या पाडू शकतो. दोन सऱ्यामध्ये एक रुंद वरंबा तयार होऊन त्यावर टोकण यंत्राच्या सहायाने एकाच वेळी खत व बी पेरता येते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT