मराठवाडा

सोयगावला अवर्षणप्रवण क्षेत्रातून वगळले

यादव शिंदे

सोयगाव, ता. 26 (जि.औरंगाबाद) ः सोयगावला शासनाच्या अवर्षणप्रवण क्षेत्रातून वगळल्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाने जारी केला आहे. यामुळे शासनाच्या निकषाचा शेतकऱ्यांना अडसर ठरला आहे. पावसाच्या सरासरीवरून सोयगावला अवर्षणप्रवणमधून वगळण्यात आल्याने पीक विम्याच्या लाभासाठी जोखीमस्तर कमी होणार असल्याने आणि दुष्काळाच्या मदतीत शासनाची भरीव मदत मिळणार नाही.
सोयगावसह तालुक्‍यात पावसाची सरासरी वार्षिक सरासरीच्या प्रमाणात झाली असल्याचा ठपका लावून जिल्ह्यातून सोयगावला अवर्षणप्रवण क्षेत्रातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, यामध्ये गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, औरंगाबाद, खुलताबाद या तालुक्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. सोयगावला पावसाने वार्षिक सरासरीच्या अपेक्षित सरासरी गाठल्याचा निकष लावण्यात आलेला आहे. त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातून सोयगावला वगळणी करण्यात आली आहे.


पीक विम्याचा जोखीमस्तर होणार कमी

यंदाच्या खरिपाच्या हंगामाची नजर अंदाज आणेवारीची तयारी महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. नजर अंदाज आणेवारी घोषित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागांना वाटणी करण्यात आली आहे. यामध्ये नजर अंदाज आणेवारीवरून पीक विम्याचा पहिला निकष ठरविण्यात येणार आहे. अवर्षण प्रवणमधून सोयगावची वगळणी झाल्याने पीक विम्याचा जोखीमस्तर कमी बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात पीकविमा मंजूर झाल्यास पीकविम्याची कमी रक्कम हातात मिळणार आहे.

ना कोरडा दुष्काळ ना, ओला दुष्काळ

दरम्यान, एकीकडे शासनाने ठरवून दिलेल्या निकषांवरून पावसाच्या सरासरीवरून सोयगावला अवर्षणप्रवण क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र अतिपावसाने पिकांची स्थिती चिंताग्रस्त झाली असताना ओल्या दुष्काळाचा निकषही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ना कोरडा दुष्काळ ना ओला दुष्काळ अशी नामुष्की ओढावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT