Parbhani District Collector Anchal Goyal  esakal
मराठवाडा

परभणीत कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी विशेष मोहिम,जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

परभणी जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचा टक्का वाढवा, यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे.

गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचा टक्का वाढवा. यासाठी येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण मोहिम घेतली जाणार आहे. दोन्ही दिवस सलग १६ तास सर्वच सेंटरवरून नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. नववर्षाचे आगमन करू या सलग लसीकरण या ब्रीद वाक्याखाली ही मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल (Anchal Goyal) यांनी सोमवारी (ता.२७) दिली. परभणी (Parbhani) जिल्ह्यात लसीकरणाचे काम प्रशासकीय पातळीवरून जोमाने केले जात आहे. अगदी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासह त्यांच्या अधिनिस्त काम करणारे अधिकारीही लसीकरणासाठी स्वतःचा सहभाग नोंदवित आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबतची प्रचंड उदासिनता अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला मागे खेचत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. (Special Campaign For Increasing Corona Vaccination In Parbhani, District Collector Informed)

त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून दररोज निरनिराळे उपाय करून लसीकरणाचे उद्दिष्ट दिले जात आहे. जिल्ह्यात पहिला डोस (Corona Vaccination) घेणाऱ्या नागरिकांची टक्केवारी ७६ टक्क्यांवर पोहोचली आहे. परंतु दुसरा डोस घेणाऱ्यांच्या टक्केवारीत म्हणावी तशी वाढ होतांना दिसत नाही. ही टक्केवारी केवळ ४५ टक्केच आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणाऱ्या मध्ये डोसची तारीख ओलांडलेल्या नागरीकांचा आकडा १ लाख २९ हजार ८७५ ऐवढा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला वारंवार यावर भर देऊन जनजागृती करावी लागत आहे. दुसऱ्या डोसची टक्केवारी वाढावी व अद्यापही लसीकरणाचा पहिला डोस ज्यांनी घेतला नाही. त्यांचे लसीकरण करण्यासाठी येत्या ३० व ३१ डिसेंबर या दोन दिवसांत विशेष लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. नववर्षाचे आगमन, करूया सलग लसीकरण! या ब्रिद वाक्यानुसार दोन दिवसांत जास्तीत-जास्त लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र व तसेच लसीकरण केंद्रावर सलग १६ तास लसीकरण केले जाणार आहे असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदासराव पवार यांची उपस्थिती होती.

परदेशातून आलेल्या २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

जगात कोरोनाचा ओमिक्रॉन या व्हेरियंटचा प्रसार झाल्यानंतर परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. परभणी जिल्ह्यात ही असे २९ नागरीक या दरम्यान आलेले आहेत. या सर्वाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यातील सर्वांचे अहवाल हे निगेटीव्ह आहे असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांच्या उपाययोजना

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील टास्क फोर्सच्या सदस्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य तज्ज्ञांनी जिल्ह्यात डबल मास्क किंवा एन-९५ मास्क वापरणे बंधनकारक करावे. लसीकरणाच्या दोन डोसमधील दरी दूर करणे या सोबतच इतर महत्त्वपुर्ण उपाय योजना सुचविल्या आहेत.

जिल्ह्यात जिल्हादंडाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पोलिसही संपूर्ण सहकार्य करणार आहेत. चेकपोस्टवर कडकपणे तपासणी केली जाईल. आरोग्य पथकासोबत पोलिस कर्मचारी ही ठेवण्यात येणार आहेत. विनामास्क फिरणाऱ्यावरही कडक स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे.

- जयंत मीना, पोलिस अधीक्षक, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT