file photo 
मराठवाडा

Video : आधी फवारणी, मगच मिळणार इंधन

अनिल जोशी

झरी (जि. परभणी) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून झरी (ता. परभणी) येथील विक्रांत पेट्रोलपंपावर आलेल्या वाहनधारकासह वाहनावर  सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे.

परभणी शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या तीन दिवसांच्या संचारबंदी लागू केली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्यासाठी साथरोग प्रतिबंध कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. गुरुवारी (ता. १६) परभणीत पहिला कोरोनाचा रुग्ण अढळून आला. हा रुग्ण शेजारील हिंगोली जिल्ह्यातील असून तो पुण्याहून नातेवाइकाकडे आला होता. रुग्ण अढळताच प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने ता. १७ ते १९ दरम्यान, संचारबंदी लागू केली होती. किराना दुकाने, भाजीपाला विक्रीदेखील बंद करण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सेवा व अन्न पुरविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे तीन दिवस शहरात सन्नाटा पसरला होता. कोरोनाचा रुग्ण अढळलेल्या भागापासून तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला होता. 

पंपावर येण्याआधी वाहनावर सॅनिटायझर फवारणी
दरम्यान, ग्रामीण भागातही शासन नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असल्याने गंभीरतने काळजी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवेत पेट्रोलपंप असल्याने झरी (ता.परभणी) या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील वाहने इंधनासाठी येत असतात. त्यामुळे पंपावर येण्याआधी वाहनावर सॅनिटायझर फवारणी केल्यास धोका होणार नाही, या उद्देशाने झरी येथील विक्रांत पेट्रोलपंपावर फवारणी केली जात आहे. आधी फवारणी, मगच इंधन, असा नियम करत त्याचची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. तसेच दररोज दोन वेळा पंप परिसराची औषधांनी फवारणी केली जात आहे. पंपावरील कर्मचारी सुरक्षित राहावेत तसेच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ही काळजी घेत असल्याचे पंपाच्या संचालिका मेघा सावंत यांनी सांगितले. यातून संबंधित वाहनधारकदेखील सुरक्षित होतो. याकामी व्यवस्थापक आबा यादव यांचीही मदत होत आहे.

हेही वाचा - संचारबंदी शिथील होताच उसळली गर्दी

सीमेवर कडक बंदोबस्त
रुग्ण अढळताच जिल्ह्याच्या सर्वच सीमेवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्रंदिवस येणाऱ्या- जाणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. पुणे, मुंबई येथून पायी येणाऱ्यांचे लोंढे थांबत नसल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT