st bus st bus
मराठवाडा

चांगली बातमी! लाल परी पुन्हा धावणार रस्त्यावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्व विभागांना मोठा आर्थिक फटका बसला आहे

सयाजी शेळके

उस्मानाबाद: जिल्ह्यातील बससेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी (ता. ३१) याबाबत आदेश काढले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यात लालपरी धावणार आहे. तर जिल्ह्यातील कृषीविषयक दुकाने आता दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शनिवारी तसेच रविवारी असणारा जनता कर्फ्यू (covid 19 curfew) आता केवळ रविवारी सुरू राहणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्व विभागांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातील एक म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटी बससेवा होय. गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही आगारातील बसेस एकाच ठिकाणी थांबलेल्या होत्या. त्यामुळे दररोज लाखो रुपयांचा फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या घटत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत काही घटकांसाठी शिथिलता आणली आहे. बससेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावरून धावताना दिसणार आहे.

प्रवासी मिळवण्याचे आव्हान-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबातील सदस्यांना फटके सहन करावे लागले आहेत. कोरोनामुळे सर्वांना मोठा आर्थिक ताण आला आहे. तर अन्य काही कुटुंबाने सदस्य गमविले आहेत. त्यामुळे अद्यापही अनेक कुटुंब भीतीच्या सावटाखाली असून सामाजिक अंतर पाळून आहेत. शिवाय इतर कोणत्याही बाबींना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी आता प्रवासी मिळविण्याचे आवाहन महामंडळासमोर असणार आहे.

कृषी दुकाने दुपारी दोनपर्यंत

पावसाळा सुरू होण्यास जेमतेम १० दिवसांचा कालावधी बाकी आहे. शेतकरी बियाणे-खते खरेदीच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांना याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषी दुकाने आता दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केवळ रविवारीच जनता कर्फ्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी तसेच रविवारी जनता कर्फ्यू होता. त्यामुळे सर्वच व्यवहार या दिवशी बंद ठेवले जात होते. परिणामी अनेक सेवा यादिवशी बंदच ठेवल्या जात होत्या. दरम्यान लाट ओसरत असल्याने आता केवळ रविवारीच जनता कर्फ्यू ठेवण्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT