अन्न पदार्थ उत्पादक.jpg 
मराठवाडा

अन्न पदार्थ व्यवसाय सुरु करताय....मग अशी घ्यावी दक्षता

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्ह्यात अन्न पदार्थ उत्पादकांना त्यांचा व्यवसाय सुरु ठेवताना मर्यादित कामगारांचे आरोग्य सुरक्षित अंतर किमान एक मीटर, मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझरचा आवश्य वापर करावा. तसेच कलम १४४ चा देखील भंग होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

हॉटेल व्यवसायिकांना केवळ पार्सलची मुभा 
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडून नुकतेच नांदेड जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकासंदर्भात लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना व अन्न आस्थापना सुरु ठेवण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांना केवळ ग्राहकांना पार्सल वितरीत करण्याची मुभा देण्यात आली आहे. किरकोळ किराणा दुकान, घाऊक किराणा दुकान, फळे, भाजीपाला विक्री केंद्रे, दुध डेअरी, दुध केंद्रे हे व्यवसाय सुरु राहतील. परंतू कामगारांचे आरोग्य, सुरक्षित अंतर किमान एक मीटर, मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. 

फरसान, मिठाई दुकाने केवळ विक्रीसाठी चालू  
शितगृहे, कन्फेक्शनरी, फरसान, मिठाई दुकाने केवळ विक्रीसाठी चालू राहतील. तेथे ग्राहकांना बसुन खाद्य पदार्थ खाण्याची व्यवस्था नसावी, परंतू पार्सल देता येवू शकेल. वरील नमूद सर्व अन्न आस्थापना, औषधी आस्थापनातील उपलब्ध असलेला कर्मचारी वर्ग हा कोरोनामुक्त असल्याची खात्री करावी. प्रत्येक कामगारास मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कामावर रुजू करुन घेऊ नये. 

ग्राहकांना मास्क शिवाय प्रवेश देवू नये
ज्या-ज्या अन्न, औषधी आस्थापनामध्ये ग्राहकांना आत प्रवेश असले त्या सर्व ग्राहकांना त्यांनी मास्क परिधान केल्याशिवाय आस्थापनेत प्रवेश देवू नये. त्या सर्व ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे. सर्व प्रकारच्या आवश्यक सेवेमधील खाद्य पदार्थांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात येत आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
ज्या आस्थापना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी कोव्हीड १९ विरुद्ध आवश्यक त्या उपाययोजना व सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कामाचे ठिकाणी आरोग्य विभागाने ठरवून दिलेले सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, याची जिल्ह्यातील अन्न उत्पादक आस्थापना, विक्री आस्थापनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

आर. के. नारायण यांच्या अजरामर कथांना उजाळा; ओटीटीवर बालदिनानिमित्त 'मालगुडी डेज'चा नजराणा

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टी 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अखेर तारक मेहतामधील भिडेंची सोनू अडकणार लग्नबंधनात ! टप्पूशी नाही तर या क्रिएटरशी डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

SCROLL FOR NEXT