चिकलठाणा ः घटनास्थळी असलेला पोलिस बंदोबस्त. Chikalthana esakal
मराठवाडा

Chatrapati Sambhaji Nagar: आवाजावरून दोन गटांत वाद? चिकलठाण्यात दोन गटांत दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात, तणावपूर्ण शांतता

दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, ता. १२ ः शहरातील चिकलठाणा परिसरामध्ये मंगळवारी (ता. १२) रात्री नऊच्या सुमारास दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला. दोन्हींकडून दगडफेक झाली. पोलिसांनी फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यानंतरही दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. रात्री उशिरापर्यंत परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

चिकलठाणा येथील कामगार कॉलनीमध्ये काही अंतरावर दोन भिन्न धार्मिक स्थळं आहेत. या परिसरात सर्वच धर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. काहींचा शेजार भिन्नधर्मीय आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास एकमेकांच्या धार्मिक भावनेचा आदर करीत वेगवेगळ्या वेळेत आपापली उपासना करण्याचे दोन्ही गटांकडून ठरले होते. पण, काही तरुणांनी ऐकले नाही. त्यांनी एकाच वेळी लाउडस्पीकरवरून मोठा आवाज करून आपापली उपासना सुरू केली. त्यानंतर तरुणांच्या या गटाने एकमेकांसमोर येत नारे दिले.

दरम्यान, दोन्हींकडून दगडफेक सुरू झाली. परिणामी, तणाव वाढला. पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत आणि राखीव पोलिस सहायक आयुक्त अशोक थोरात यांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठत जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक, रॅपिड ॲक्शन फोर्सचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद नव्हता.

हा वाद किरकोळ होता, तो मिटला. नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी. शहरात कुठेही तणावाचे वातावरण नाही.

- अशोक थोरात, सहायक पोलिस आयुक्त

आवाजावरून दोन गटांत वाद झाला. मग मोठ्या प्रमाणात जमाव जमला. यामुळे चिकलठाणा परिसरात काही काळ वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जात वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही गटांतील जमावाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

Latest Maharashtra News Updates : १०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन

Winter Health : पौष्टिक आहारच वाढवेल प्रतिकारशक्ती

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

SCROLL FOR NEXT