band 
मराठवाडा

संचारबंदी कडक, घराबाहेर पडू नका, कुठे ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः शहरात ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवस लागू केलेल्या संचारबंदीची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचीदेखील विचारपूस करूनच त्यांना सोडले जात आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत होते. मात्र, शुक्रवारी (ता. १७) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी परत गॅस वितरक व दूधवाल्यांना सकाळी सहा ते नऊ या तीन तासांची सूट देण्याचे आदेश दिले आहेत.

परभणी शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हावासीयांच्या पायाखालील वाळूच सरकली. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील खडबडून जाग्या झाल्या आहेत. महापालिकांचे आरोग्य पथक अधिक गतीने कार्यान्वित झाले आहेत. 

आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना सुरू केल्या
या परिस्थितीत ज्या एमआयडीसी भागात हा रुग्ण सापडलेला आहे त्या भागाला सील करण्यात आले आहे. ज्या घरात हा रुग्ण होता तो भागदेखील निर्जंतुक करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणांनी हव्या त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. रुग्ण आढळल्याचे समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी कडक धोरण स्वीकारून जिल्ह्यात तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी (ता. १६) रात्री १२ वाजल्यापासून शहरात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे.

जागोजागी पोलिस
जागोजागी व कॉर्नर - कॉर्नरवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ व तसेच कॉलन्यांच्या कॉर्नरवरदेखील पोलिस तैनात आहेत. अत्यावश्यक सेवांच्या गाड्या व ज्यांना पास आहेत त्यांचीदेखील विचारपूस केली जात आहे.

दूध व गॅस वितरक वगळले
तीन दिवसांच्या या संचारबंदीतून दूधवाले व गॅस वितरकांना वगळण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. परंतु, या दोन्ही सेवा देण्यासाठी फक्त तीन तासांचा अवधी देण्यात आला आहे. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंतच घरोघरी दूध पोचविणारे व गॅस वितरकांना परवानगी देण्यात आली आहे. 

‘त्या’ भागातील चौदाशे घरांचा सर्व्हे सुरू
परभणी ः ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या त्या भागातील एक हजार ४०० घरांचा सर्व्हे सुरू करण्यात आला असून हा सर्व्हे पुढील १४ दिवस दररोज केला जाणार आहे. यासाठी १२ अंगणवाडी सेविका व मदतनीसांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सुरक्षिततेची कोणती उपाययोजना करण्यात आली का, हा मोठा प्रश्नच आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने हा परिसर सील केला. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या बहिणीच्या घरातील पाच व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेतले आहेत. या घटनेनंतर सदरील परिसराचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेवकांसह आयुक्तांनी या भागास भेट दिली. तातडीने या घराच्या अवतीभवती असणाऱ्या एक हजार ४०० घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी १२ अंगवाडी सेविका व मदतनीसांना कामास लावण्यात आले आहे. या १४ दिवसांच्या सर्व्हे दरम्यान या परिसरातील चौदाशे घरांना भेटी देऊन लोकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या कालावधीत परिसरातील कोण्यात लोकांना काही लक्षणे आढळून येतात का याची खातरजमा केली जात आहे.

अंगणवाडी सेविकांना सुरक्षितता आहे का ?
ज्या भागात कोविड १९ बाधित रुग्ण सापडलेला आहे. त्या भागात सर्व्हेसाठी पाठविण्यात आलेल्या १२ अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना केल्या जाताहेत का, हा मोठा प्रश्न आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचा विमादेखील काढण्यात आलेला नाही. अशा विपरित परिस्थितीतही अंगवाडी सेविका व मदतनीस देशहिताच्या कामासाठी कोरोनाची ही लढाई लढत आहेत. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT