student online attendance only 25 percent school education parbhani esakal
मराठवाडा

Student Online Attendance : विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती २५ टक्केच; प्रशिक्षणाच्या अभावाचा परिणाम

१ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती या ॲप्लीकेशनद्वारे घेण्याच्या देखील सूचना

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने विद्या समिक्षा केंद्रांतर्गत अटेन्डन्स बॉट (चॅटबॉट) या अॅपवर ता. १ डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याचे आदेश दिले होते. परंतू प्रशिक्षण व जनजागृतीच्या अभावी अनेक शाळांनी अद्यापही विद्यार्थ्यांच्या ऑनलाई उपस्थिती नोंदणीला सुरवात केली नाही.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने ता. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी विभागीय उपसंचालकांसह जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या संदर्भात कार्यवाहीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पत्र पाठवले होते.

ता. १ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती या ॲप्लीकेशनद्वारे घेण्याच्या देखील सूचना होत्या. त्या संदर्भात काही मुख्याध्यापक, शिक्षकांना देखील ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात येते. परंतू जिल्ह्यातील ऑनलाईन उपस्थिती नोंदणीची परिस्थिती पाहता शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांना व्यापक प्रशिक्षणाची,

त्याबाबतच्या जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच की काय अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांना तर सोडाच मुख्याध्यापकांनी देखील याबाबत फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे.

वर्गशिक्षकांवर उपस्थिती नोंदवण्याची जबाबदारी

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यासाठी स्विफ्टचॅट हे ॲप्लीकेशन प्रत्येक वर्गशिक्षकांना घ्यावे लागणार आहे. अटेंन्डस बॉटवर ही उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

वर्ग शिक्षकांना शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला क्रमांकाचाच मोबाईल वापरावा लागणार आहे. सध्यातरी ज्या वर्ग शिक्षकांना शालार्थ आयडी आहेत, त्यांनाच ही उपस्थिती नोंदवता येणार आहे. नसतील तर अन्य शिक्षकांच्या मोबाईलवरुन उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

ऑनलाईनबाबत अडचणींचे डोंगर

अगोदरच शाळांच्या मागे यु डायस प्लस, मिड डे मील, मासिक देयके यासह अनेक योजनांची माहिती, पत्रके ऑनलाईन भरण्याचा ससेमिरा मागे लागलेला आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शाळांना तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

प्रामुख्याने मोबाईल नेटवर्क प्रश्न आहे. काही ठिकाणी विजेचा देखील प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा एक ऑनलाईन नोंदणी आल्यामुळे अनेक वर्गशिक्षकांना अडचणींचा सामना करुन हे उद्दीष्ट पूर्ण करावे लागणार आहे.

२५ टक्के शाळांचाच सहभाग

जिल्ह्यात २ हजार १०५ शाळा आहेत. १ ते १० वीच्या विद्यार्थ्यी संख्या २ लाख ४० हजाराच्या आसपास आहे. १ डिसेंबरपासून या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याच्या सूचना असल्या तरी जिल्ह्यातील फार कमी म्हणजे जवळपास २५ टक्के शाळांनीच नोंदणीला सुरुवात केल्याची माहिती आहे.

त्याही बहुतांश शाळा जि. प. च्या आहे. याचा अर्थ अजूनही जिल्ह्यातील खासगी शाळांना याबाबत फारशी माहिती नाही, माहिती असली तर या बाबत प्रशिक्षण नसल्याचे दिसून येते.

शासनाने शालेयस्तरावरील माहिती एकत्रित करुन त्यावर गरजेनूसार निर्णय घेण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याचा उपक्रम ता. एक १ डिसेंबरपासून सुरु आहे. सद्यस्थितीत २५ टक्के शाळांनी नोंदणीची प्रक्रिया सुरु केली. उर्वरीत शाळांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

— गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी.

शासनाने शालेयस्तरावरील माहिती एकत्रित करुन त्यावर गरजेनूसार निर्णय घेण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याचा उपक्रम ता. एक १ डिसेंबरपासून सुरु आहे.

सद्यस्थितीत २५ टक्के शाळांनी नोंदणीची प्रक्रिया सुरु केली. उर्वरीत शाळांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

— गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT