परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक महेश देशमुख यांना अचानक त्यांच्या पदावरून दुर करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी मंगळवारी (ता.आठ) दिले आहेत. या आदेशाला विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. विद्यार्थ्यांनी बुधवारी कुलगुरु कार्यालयासमोर निदर्शने करून या आदेशाला विरोध केला. परभणी (Parbhani) येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) कुलगुरु डॉ. अशोक ढवण (Ashok Dhawan) यांनी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक महेश देशमुख यांना त्यांच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी पदावरून दुर होण्याचे आदेश दिले आहेत.
त्याच्याकडील पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या ९ वर्षांपासून महेश देशमुख हे विद्यार्थी कल्याण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेत त्यांच्यामध्ये खेळभावना निर्माण करण्याचे मोठे काम केलेले आहे. परंतू, अचानक त्यांच्याकडील हा पदभार काढून घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी कुलगुरु डॉ. ढवण यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत कुलगुरु कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या संदर्भात कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, महेश देशमुख यांनी विद्यार्थी कल्याण अधिकारी असताना विद्यार्थ्यांसाठी जिमखाण्यामध्ये नवीन साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना जागृत केली, आणि वेळोवेळी विद्यार्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. देशमुख हे तळमळीने काम करित असतांनाही त्यांना विद्यार्थी कल्याण अधिकारी पदावरून काम दुर केले असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
अन्यथा गुरुवारपासून बेमुदत धरणे
महेश देशमुख यांना तातडीने विद्यार्थी कल्याण अधिकारी पदाचा कारभार परत द्यावा अशी मागणी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केली आहे. असे न झाल्यास गुरुवारपासून (ता.दहा) विद्यापीठातील सर्व विद्यार्थी विद्यापीठ बंद ठेवून कुलगुरु यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.