महिला बचत गटांची यशोगाथा sakal
मराठवाडा

जालना : महिला बचत गटांची यशोगाथा

द्रोण, घासणी, पापड उद्योगातून महिलांनी मिळवला रोजगार

सुभाष बिडे

घनसावंगी : पुर्वीच्या काळी पळसाच्या पाना पासून अनेक वर्षा पासून पत्रावळी / द्रोण बनण्यात येत असत परंतू आता आधुनिकीकरणामुळे पत्रावळीची जागा पेपर डिश ने घेतली आहे. वापरा आणि फेकून नष्ट करा आणि निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवा. यातून प्रगती महिला बचत गट तिर्थपुरी ता. घनसावंगी येथील महिलांनी द्रोण बनविण्याबरोबर घासणी व पापड उद्योग सुरू करून रोजगार मिळवला आहे.

तिर्थपुरीच्या महिला शिवकन्या भानूदास चिमणे, सचिव सारीका अशोक चिमणे, संचालक रूखमीन रामदास चिमणे या तीन महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्रीत येत पंचायत समिती घनसावंगी च्या जीवन्नोती अभियानांतर्गत उमेद या प्रकल्पातून उत्पादक गट निर्माण करून प्रगती महिला बचत गट तयार करून त्यांना मिळालेल्या अर्थसहाय्यातून प्रथभच या महिलांनी पाच वर्षापूर्वी द्रोण बनविण्याचा व्यवसाय सुरू केला त्यासाठी त्यांनी कच्चा माल विविध रंगांचे वॉटर प्रूफ कागद, पेपर डिश बनविण्याचे आहेत त्या मागणी नुसार सिल्वर ,गोल्ड ,प्लास्टिक कोटेड पुणे येथून आणून हा व्यवसाय सुरू केला.नियमीत दिवसाला मागणीनुसार तीन हजारापर्यत द्रोण बनविण्यात येत आहे. या व्यवसायातून त्यांना मिळालेल्या फायद्यातून पुढे तीन महिन्यापूर्वी घासणी बनविणे तसेच पापड उद्योग ही सुरू केला आहे.

Success stories women self help group

एका दिवसाला दीड हजार घासणी व तीस ते चाळीस किलोचे पापड त्या बनवित आहे. या प्रत्येक वस्तूची त्यांच्याकडे मशीन आहे. यासाठी त्यांनी दोन ते अडीच लाख रूपये खर्च केले आहे. नियमितपणे त्या तिघी काम करतात वेळेप्रसंगी महिलांना ही रोजगार उपल्बध करून देतात. जिथे उत्पादन घेता त्याच ठिकाणापासून बँनर, बोर्ड लावून विक्री करतात तसेच आठवडी बाजार व घनसावंगी, कुंभारपिंपळगाव, तिर्थपुरी येथील दुकानदारांना हे साहीत्य विक्री करतात. द्रोण तर जालन्यातील एका कंपनीला विक्री करीत आहे. यातून मिळालेल्या पैशातून या महिला स्वालंबी बनल्या आहे. तिर्थपूरी ता. घनसावंगी येथील प्रगती महिला बचत गटांच्या माध्यमातून घासणी व द्रोण बनविण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला असून सध्या या व्यवसायाला घनसावंगी तालुक्यामध्ये चांगले महत्व निर्माण झाले आहे. या व्यवसायातून स्थानीक बाजारपेठ चांगली मिळत आहे. त्यांना या उमेद प्रकल्पांच्या व्यवस्थापक सुप्रभा खेडकर, तालुका समन्वयक निलेश तायडे व इतर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे.

महिला बचत गट म्हणजे केवळ बचत आणि गरजेसाठी वापर असे मानले जायचे. गेल्या काही वर्षांपासून त्यात बदल होत असून, महिलांमध्ये उद्योजकता विकसित होत आहे. यातून उत्पादक गटांच्या माध्यमातून आम्ही महिलांनी हा व्यवसाय सुरू केला यातून आम्ही ग्रामीण भागात आवश्यक असलेली पापडउद्योग, द्रोण, घासणी बनविण्याचा व्यवसाय केला असून यातून आम्हाला चांगली कमाई मिळत आहे. आम्ही या व्यवसायात समाधानी आहोत.

- शिवकन्या चिमणे अध्यक्षा प्रगती महिला समूह गट तिर्थपुरी

विकसित केला ब्रॅण्ड महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी बचत गटांची मदत होत असून, बचत गटांच्या व्यवसायांनी चांगलेच बाळसे धरले आहे. केवळ उत्पादन करून न थांबता विक्रीसाठी योग्य ते प्रयत्न करण्यातही त्या मागे पडत नाहीत. या उद्योगांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत असून केवळ विविध उत्पादने तयार करून न थांबता त्यांची ब्रँड नावासह विक्री करत आहे.

- सारीका चिमणे, सचिव, प्रगती महिला समूह गट तिर्थपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT