Success Story Agriculture MPSC Balasaheb Naikkinde Esakal
मराठवाडा

Success Story: स्पर्धा परीक्षेमध्ये हिरमोड; शेतीत वरचढ! तरुणाने सिमला मिरचीतून 4 महिन्यात घेतले 10 लाखांचे उत्पन्न

आशुतोष मसगौंडे

धनंजय शेटे

भूम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश न मिळाल्याने त्याने शेतीत झोकून दिले. आधुनिक शेतीची कास धरली. त्यात तो यशस्वी झाला आणि वर्षाकाठी चांगली कमाई करीत आहे.

भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील बाळासाहेब नाईककिंदे असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे. त्याने बंधू वैभव नाईककिंदे यांच्या साथीने सिमला मिरची पिकातून चार महिन्यांमध्ये दहा लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

बाळासाहेब हे २००८ मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी (एमपीएससी) अभ्यास करत होते. त्यांनी काही वर्षे अभ्यास केला, परीक्षा दिल्या. त्यात त्यांना यश आले नाही.

दुसरीकडे घरी शेती पाहण्यासाठी आणि आई-वडिलांच्या मदतीसाठी कोणीच नव्हते. शेतीतून उत्पादन आणि उत्पन्न कमी येत होते. त्यामुळे बाळासाहेबांनी आधुनिक शेतीचा विचार केला.

पहिल्या वर्षी त्यांनी सिमला मिरची लागवड केली. त्यातून त्यांना दहा लाखांचे उत्पन्न मिळाले. सध्या त्यांच्याकडे अडीच एकर क्षेत्रावर पेरूची बाग व तीन एकरांवर सिमला मिरची आहे. गेल्या जुलैमध्ये लागवड केलेल्या सिमला मिरचीचे आतापर्यंत सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांना आणखी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती व पिके घेतली जात होती. त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. आई वडिलांसह भाऊ वैभव यांच्या मदतीने त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.

पदवी घेतल्यावर तीन वर्ष वाशी येथे स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी केली. परंतु, आई-वडिलांना मदत व शेतीत कष्ट घ्यायचा निर्णय घेतला. आधुनिक शेतीचा प्रयोग केला. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच नफा मिळतो. तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून वेगवेगळी पिके घ्यावीत.
बाळासाहेब नाईकिंदे, शेतकरी, पाठसांगवी

दृष्टिक्षेपात

  • नाईकिंदे यांची १८ एकर शेती

  • पेरू, सिमला मिरची, कांदा, सोयाबीन, उडीद आदी पिके

  • सिमला मिरचीला व्यापाऱ्यांकडून जागेवरच मागणी, चांगला दर

  • सिमला मिरची लागवडीपासून आतापर्यंत साडेतीन लाख खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang-Baba Siddique: "सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो..." बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी अखेर बिश्नोई टोळीने स्वीकारली

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, "मला तर वाटतेय..."

गोफण | आमच्याही पक्षात कलाकार पाहिजे!

"सिनेमाची स्वतःचं तिकीट खरेदी करून खोटं कलेक्शन जाहीर केलं" , दिव्या खोसलाने केला आलियावर आरोप

State Funeral For Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT