dharashiv sakal
मराठवाडा

Dharashiv News : कळंबच्या भूमिपुत्राचे गेट्स ऑफ हेवनमध्ये यश ; सूरज मुंढे यांनी ८९ तास ४५ मिनिटांत कापले १,२०० कि.मी. अंतर

देशात सर्वात खडतर मानली जाणारी ‘गेट्स ऑफ हेवन’ (जीओएच २०२४) ही १२०० किलोमीटर अंतराची सायकल शर्यत कळंब तालुक्यातील उपळाई येथील भूमिपुत्र तथा सध्या पिंपरी चिंचवड येथे स्थायिक असलेले सायकलपटू सूरज मुंढे यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केली.

सकाळ वृत्तसेवा

कळंब : देशात सर्वात खडतर मानली जाणारी ‘गेट्स ऑफ हेवन’ (जीओएच २०२४) ही १२०० किलोमीटर अंतराची सायकल शर्यत कळंब तालुक्यातील उपळाई येथील भूमिपुत्र तथा सध्या पिंपरी चिंचवड येथे स्थायिक असलेले सायकलपटू सूरज मुंढे यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केली. त्यांनी हा प्रवास ८९ तास ४५ मिनिटांत पूर्ण केला.

धाराशिव जिल्ह्यातून पहिले ‘जिओएच’ फिनिशर होण्याचा मान त्यांनी मिळवला. बंगळूर रॅडुनिअर्सतर्फे दरवर्षी ही शर्यत भरविली जाते. यंदा २४ जानेवारीला शर्यतीला सुरवात झाली. तिचा मार्ग कर्नाटक, तमिळनाडू व केरळ या तीन राज्यांतून होता. शर्यतीसाठी देशाच्या विविध राज्यांतून १०१ सायकलपटूंनी आपला सहभाग नोंदविला. .

हे आव्हान पार पाडण्यासाठी सायकलपटूंना ऊन, वारा, धुके, थंडी, सततचा चढ-उतार, आहार व झोपेवर नियंत्रण ठेवत स्वतःला सिद्ध करायचे होते. दक्षिण भारतातील खडतर मानले जाणारे प्रामुख्याने येरकाड, कुन्नूर, दोडाबेट्टा-उटी, कलपेट्टा, ईरिट्टी, सकलेशपुर व चिकमंगलूरू असे विविध १४० किलोमीटरच्या घाटांचा प्रवासात समावेश होता.

घनदाट जंगल, पश्चिम घाटातील दऱ्या-खोऱ्या, निसर्गरम्य वातावरण हे शर्यतीचे वैशिष्ट्य होते. जवळपास ५० टक्के मार्ग हा याच भागातून गेला. यामध्ये, एकूण १४००० मीटर्सचे इलेव्हेशन पार करायचे होते. सूरज यांनी हा खडतर प्रवास पहिल्याच प्रयत्नात निर्धारित ९० तासांच्या वेळेच्या तुलनेत ८९ तास व ४५ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केला. सूरजने आपल्या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक, आपले कुटुंब व सहयोगी मित्रांना दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT