Tanaji Sawant And Rahul Mote esakal
मराठवाडा

तानाजी सावंत-राहुल मोटेंना जनतेने नाकारले, वाशी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोटे यांना जनतेने नाकारले आहे. तुलनेने शक्ती कमी असलेल्या भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले आहे.

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : भुम,परंडा, वाशी मतदारसंघाचे आजी-माजी आमदारांना जनतेने नाकारले आहे. त्या ठिकाणी तुलनेने शक्ती कमी असलेल्या भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्याने विद्यमान प्रा.तानाजी सावंताना (Tanaji Sawant) जबर झटका बसल्याचे दिसुन येत आहे. वाशी नगरपंचायतमध्ये (Vashi Nagarpanchayat Election) शिवसेनेची एकहाती सत्ता होती. पण भाजपने ती खेचुन आणत एकप्रकारे सावंताना मोठा धक्का दिल्याचे दिसुन येत आहे. प्रा.सावंत भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाच हा निकाल हाती आल्याने जनतेने त्याना नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रा.सावंत व माजी आमदार राहुल मोटे (Rahul Mote) यानी वाशीची नगरपंचायत आपल्याकडे येण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती. तिथे राहुल मोटे यांना तर एकही जागा मिळाली नसल्याने त्यानाही मोठा धक्का मानला जात आहे. वाशी नगरपंचायतमध्ये प्रशांत चेडे यांच्याकडे एकहाती सत्तेच्या चाव्या जनतेने गेली काही वर्ष दिल्या होत्या. (Tanaji Sawant, Rahul Mote Lose Strong hold, BJP Win Vashi Nagar Panchayat Election)

त्यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी तब्बल 13 जागेवर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. मात्र त्यानंतर प्रशांत चेडे यांनी काँग्रेस सोडुन प्रा.सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. साहजिच विधानसभेला प्रा.सावंत यांना वाशीमध्ये मोठे मताधिक्य देखील मिळाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळालेले असतानाही जनतेने दोन वर्षातच त्याना नाकारल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रशांत चेडे यांच्याबरोबरच विद्यमान आमदार असलेले प्रा.सावंत यांचाही प्रभाव कमी झाल्याचे चित्र निकालावरुन स्पष्ट होत आहे. त्या ठिकाणी तुलनेने शक्ती कमी असलेल्या भाजपाला (Osmanabad) लोकांनी भरभरुन मतदान केल्याचे दिसुन येत आहे. शिवाय एकहाती सत्ता स्थापन करुन आजी-माजी आमदारांना एकप्रकारे आत्मचिंतन करायला लावल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत फक्त एक जागा मिळाली होती. यावेळी तर एकही जागा पदरात पडलेली नाही.

या ठिकाणी राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचारसभा आयोजीत करण्यात आल्या होत्या, तरीही जनतेने राष्ट्रवादी व तेथील नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे माजी आमदार मोटे यांना अजुन बराच टप्पा गाठावा लागणार आहे. त्याचवेळी विद्यमान आमदार असलेले प्रा.सावंत गेल्या दोन वर्षात मतदारसंघामध्ये अपवादानेच दिसल्याने त्यांच्यावरही लोकांनी विश्वास ठेवल्याचे दिसुन येत नाही. शिवाय गेल्या काही दिवसापासुन त्यांची भाजपशी होत असलेली सलगी चांगलीच चर्चेत होती. त्याच काळामध्ये हा निकाल आल्याने कदाचित जनतेने त्यांना द्यायचा तो संदेश दिल्याचे बोलले जात आहे. राजकीय पटलावर कायमच कोणाच्या मागे जनता राहत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले असुन जनतेला गृहित धरणे अनेकदा किती महागात पडु शकते हेच या निकालावरुन समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT