File photo 
मराठवाडा

Video : उंटांचा ‘तांडा’ माळेगाव यात्रेत ‘विसावला’

नवनाथ येवले

नांदेड : माळेगाव यात्रेसाठी जिल्ह्यातील उंट व्यापारी चार - पाचच्या समुहाने दीड महिन्यापूर्वी राजस्थानमधील जटवाड, पाटण येथून उंट खेरदी करतात. तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने उंट खरेदी करून त्यांचा माळेगावकडे परतीचा पायी प्रवास सुरू होतो. अजागर प्राणी असल्यामुळे उंटाची वाहनाद्वारे वाहतूक केली जात नाही. पर्यायाने पायी उंट हाकत हे व्यापारी माळेगाव यात्रेत दाखल होतात. दोन वर्षांपासून ते चार वर्षाच्या उंटांना माळेगाव यात्रेत चांगला बाजार मिळतो. विक्रीतून राहिलेल्या उंटाचा वर्षभर सांभाळ करावा लागतो.

राजस्थानच्या वाळवंटातील वाहन म्हणून ओळखल्या जाणारा उंट सवारीसाठी बालकांना भुरळ घालतात. राज्यात विविध ठिकाणी कसरतीचे खेळ दाखवून उपजिविका भागविणाऱ्या कलाकार कुटुंबीयांकडे ओझे वाहण्यासाठी उंटाचा वापर होतो. वाळवंटामध्ये ओझे वाहण्यापासून शेतीच्या मशागतीसाठी उंटाचा वापर होतो. बैलांच्या वापरामुळे राज्यात उंटाची केवळ बालकांच्या सवारीसह विविध कलेच्या माध्यमातून उपजिवीका भागवणारे कलाकार ओझे वाहण्यासाठी वापर करतात.

खास माळेगाव यात्रेसाठी खरेदी
जिल्ह्यातील उंट व्यापारी नियमीत उंटाचा व्यापार करत असले तरी वर्षातून केवळ माळेगाव यात्रेच्या मुहूर्तावरच राजस्थान येथून प्रत्येक व्यापारी ऐपतीप्रमाणे पाच ते दहा उंटाची खरेदी करतात. यात्रेमध्ये समाधानाकारक बाजारभाव मिळत असल्याने विक्रीनंतर राहिलेल्या उंटाचे वर्षभर पालन करावे लागते. इतर पशुंच्या तुलनेत उंटाचा खुराक केवळ झाडपाला असल्याने कमी खर्चात उंटाचे वर्षभर पालन होत असल्याचे उंट व्यापारी बालाजी नाईक म्हणतात.

राजस्थान शासनाची परवानगी
राज्यातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांना उंट खेरेदीसाठी राजस्थान शासनाची लेखी परवानगी (ना हरकत) घ्यावी लागते. त्यासाठी व्यापाऱ्यास आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड यासह किती उंट खरेदी करणार, कोठे नेणार कोणाला विकणार असे स्वयंघोषणापत्र संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे लागते. त्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने राज्यातील व्यापारी राजस्थानमध्ये उंट खरेदी करतात

खुराकाची चिंता नाही
इतर पशुंच्या तुलनेत उंटाचा खुराक ठरावीक नसल्याने त्यांचे पालन सोपे आहे. झाड पाल्यावर भुक भागवणाऱ्या उंटाचा खुराक मोठा असला तरी सहज उपलब्ध होणारा असल्याने त्याच्या खाद्याची चिंता नसते. त्यामुळे यात्रेत जरी उंटास समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तरी वर्षभरात उंट विकले जातात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

Crime News : अमरावती मार्गावर १७ किलो सोने, ५० किलो चांदी जप्त...अंबाझरी पोलिसांची कारवाई : गनमॅनसह चौघे ताब्यात

Hingoli Assembly Election 2024 : निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी थंडावणार

Best Places Near Mussoorie: मसूरीजवळील 'या' सुंदर ऑफबीट ठिकाणांना करा एक्सप्लोअर, सहल राहील स्मरणीय

Laxman Hake: ''...तर महायुतीला मतदान करा'' लक्ष्मण हाकेंनी दिला पाठिंबा; दगडापेक्षा वीट मऊ

SCROLL FOR NEXT