उमरगा - उमरगा येथे मतदान जनजागृतीसाठी शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने दुचाकी फेरी काढण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध माध्यमातुन जनजागृती सुरु आहे. या प्रयत्नास प्रतिसाद देण्यासाठी मतदारामध्ये मतदानासाठी जागृती निर्माण करावी यासाठी शहरातून शिक्षिका व इतर महिला कर्मचाऱ्यांनी दुचाकी फेरी काढली.
तहसील कार्यालय, हुतात्मा स्मारक, महादेव मंदिर, शिंदे गल्ली, जुनी पेठ, हमीद नगर, बालाजी नगर,अंतु बळी सभागृह या मार्गे फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी निवडणूक विभागाचेही सहकार्य लाभले. उपविभागीय अधिकारी, गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे, गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार, शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत कदम आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
संदीप सरपे, दयानंद पाटील, प्रवीण स्वामी, रघुवीर अरणे, उमाचंद्र सूर्यवंशी यांचेही यासाठी सहकार्य लाभले. शीला मुदगडे, आशा माने, अनिता माने, मंजुषा आकडे, इंद्रायणी सोनवणे, पार्वती गाजूलवार, उषा गाडे, पद्मिनी कवठे, आशा गुळवे, कल्पना कुलकर्णी, उषा सोनवणे, भाग्यश्री पाटील, अर्चना आबाचने, दीपा स्वामी, शिल्पा परळकर, सुनीता काजळे, सुहासिनी चव्हाण, भाग्यश्री पंडित, उर्मिला मुसळे, शुभांगी जाधव, तोलन दनाने, वर्षा शाईवाले, सुनिता खंडागळे,अर्चना भोसले, सुरेखा राठोड, स्नेहा स्वामी, माया जमादार, सिंधू माने, सरिता उपासे यांसह शिक्षीका व इतर महिला कर्मचारी फेरीत सहभागी झाल्या होत्या.
मतदान जनजागृती फेरीत नव वधु - वराचा सहभाग
उमरगा येथे मतदारांची जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांच्या दुचाकी फेरीत शूक्रवारी (ता. तीन) विवाह झालेले आणि महादेव मंदिरात दर्शनासाठी आलेले वर बालाजी नितनवरे आणि वधू पद्मावती नितनवरे यांनीही सहभाग नोंदवुन मतदान जनजागृती साठी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.