Beed Weather esakal
मराठवाडा

Beed : परळीत धुक्याची चादर, भर दुपारी नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

परळी वैजनाथ शहर व तालुक्यात धुक्याची चादर पांघरली आहे.

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : शहर व तालुक्याने धुक्याची चादर पांघरली असून रविवारी (ता.१६) दुपार झाली तरी अंगातील हुडहुडी जात नव्हती. शहरातच महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) अनुभव येऊ लागला आहे. सुर्यदर्शन न झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे नागरिकांनी भर दुपारी शेकोट्या पेटवल्या आहेत. शहर व तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून शीतलहरी वाहत आहेत. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. दोन दिवसांपासून पूर्णवेळ सुर्यदर्शन होत नसल्याने हुडहुडीत वाढ झाली असून शहर (Parli Vaijanath) व परिसरात फिरताना थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचा भास होत आहे. शनिवारी (ता.१५) थोडा वेळासाठी सुर्यदर्शन झाले होते. पण रविवारी तर सुर्यदर्शन झालेच नाही. यामुळे भर दुपारी थंड वाऱ्यामुळे (Beed) हुडहुडी भरली होती.(Temperature Come Down In Parli Vaijanath Taluka Of Beed District)

नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यासह दिवसभर श्वेटर, मफलर, कानटोपी, जरकीन उबदार कपडे परिधान केले होते. तसेच आता कुठेही थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यास जाण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्या परिसरातच महाबळेश्वर, कुलू मनाली या वातावरणामुळे तयार झाली आहे. गेल्या कितीतरी वर्षात दिवसाएवढी थंडी पडली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान वाढत्या थंडीमुळे लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडत असून सर्दी, थंडी, तापेची साथ सुरू झाली आहे. यामुळे शहरातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले असून कोरोनाच्या भितीमुळे नागरिक दवाखान्याचा रास्ता धरताना दिसून येत आहेत. या संदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, लहान मुलांना बाहेर पडू देऊ नका. तसेच दिवसभर थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT