परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गामुळे अनेक लोक बाधित झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत.
परभणी : शहरातील लिक्विड ऑक्सिजन टॅंकला (liquid oxygen tank) जिल्हा प्रशासनाने सुरक्षा पुरविली आहे. यासाठी १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती (12 officers to provide security) करण्यात आली असून या समितीमध्ये महसुल, पोलिस, महापालिका, महावितरण या महत्वाच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तीनही ऑक्सिजन टॅंकला २४ तास पोलिसांचा पहारा असणार आहे. (The district administration has appointed 12 officers to provide security to the liquid oxygen tank in Parbhani city)
परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गामुळे अनेक लोक बाधित झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत. परभणी शहरात या रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी मोठ मोठे तीन प्लॅन्ट उभे केले आहेत. त्यात जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद कोविड सेंटर व आय़टीआय येथील कोविड सेंटरच्या परिसरात हे प्लॅन्ट आहेत. या प्लॅन्टला पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लॅन्टच्या यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड होवून अप्रिय घटना घडू नये, यासाठी ही समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये महसुल, पोलिस, महापालिका, महावितरण व इतर महत्वाच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर त्या त्या स्वरुपाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे राहणार सनियंत्रण
ऑक्सिजन प्लॅन्टच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय समितीवर अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांचे सनियंत्रण असणार आहे. त्यांच्याकडे या सर्व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. ही समन्वय समिती दररोज लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टची तपासणी, सुरक्षितता, नैसर्गिक आपत्तीच्या घटना, कायदा व सुवव्यवस्था इ.च्या अनुषंगाने काम करणार आहे.
अशी आहे जबाबदारी
इंन्सीडेंट कमांडर, सुरक्षा प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय प्रमुख, तांत्रिक अधिकारी (औद्योगिक प्रशिक्षण संस्था), इलेक्ट्रीशियन, तांत्रिक अधिकारी (महावितरण), अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, रुग्णवाहिका सेवा, शव वाहिनी, स्वच्छता प्रमुख या पध्दतीने जबाबदारी वाटप करण्यात आली आहे.
(The district administration has appointed 12 officers to provide security to the liquid oxygen tank in Parbhani city)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.