जालना : शहराची जलसंजीवनी असलेल्या सीना, कुंडलिका नदीला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी मागील पाच ते सहा वर्षांपासून मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्टकडून नदीपात्रा स्वच्छतेसह खोली करणाचे काम केले जात आहे. या कामाला आता हातभार म्हणून महापालिका ही सरसावली आहे. दोन्ही नदीपात्राच्या लगतचे अतिक्रमण काढण्याची महापालिकेने तयारी केली आहे. त्यातच खोलीकरण, रूंदीकरण कामासाठी इंधन ही पुरविणार आहे. त्यामुळे सीना, कुंडलिका या दोन्ही नद्यांना त्यांचे पात्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जालना शहर हे कुंडलिका आणि सीना नदीच्या तिरावर बसलेले आहे. एकेकाळी या नद्याच पाण्याचा स्त्रोत होत्या. मात्र, शहरातील वाढलेल्या लोकसंख्यमुळे या दोन्ही नदीपात्रांना गटारीचे स्वरूप आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुंडलिका आणि सीना नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या होत्या. मात्र, मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्ट, कुंडलिका-सीना रिज्यूवनेशन ॲण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनसह ५५ सामाजिक संस्था मागील पाच ते सहा वर्षंपासून या दोन्ही नदीपात्राची स्वच्छता करून खोलीकरणाचे काम करत आहे. त्याच्या या अविरत कामामुळे महापालिकेला आता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी पुढे आली आहे.
शहरातील सुमारे १४ कि.मी. परसलेली या दोन्ही नदीपात्रावरील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेकडून पुढाकार घेतला जाणार आहे. शिवाय मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्ट, कुंडलिका-सीना रिज्यूवनेशन ॲण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनसह ५५ सामाजिक संस्थाकडून केलेल्या जाणाऱ्या खोलीकरण कामासाठी इंधन ही महापालिका पुरविणार आहे.
नदीपात्रावरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेकडून राबविली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांना त्यांचे पात्र मिळणार असून शहराची जलसंजीवनी पुन्हा प्रवाहित होण्यात मदत होणार आहे.
शहरातील कुंडलिका आणि सीन नदीपात्राचे खोलीकरणाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. या कामाला महापालिकेकडून इंधन पुरवण्यात येणार आहे. नदी पात्रालगत झालेले अतिक्रमण ही महापालिकेडून काढण्यात येणार आहे.
— संतोष खांडेकर, आयुक्त, महापालिका, जालना.
नागरिकही टाकताहेत नदीत कचरा
यंदा अल्प पाऊस झाल्याने शहरातील कुंडलिका, सीना या दोन्ही नद्या यंदा खळखळून वाहिल्या नाही. नदी पात्रात पाणी आले नसले तरी पानगवताचा मोठा वेढा पडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यात आज ही नागरिकांकडून नदीपात्रात कचरा टाकला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.