मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास गंगाखेड तालुक्यातील खादगावने प्रतिसाद दिला. व कोरोनास दूर ठेवण्यात यश मिळवले.
गंगाखेड (परभणी) : गावावर आलेले कोरोनाचे (Corona) संकट गावाच्या वेशीबाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न केले. आज गाव पूर्णपणे कोरोना मुक्त झाले. ही किमया घडवून आणली आहे, ती तालुक्यातील खादगाव ग्रामस्थांनी. ग्रामस्थाच्या सामूहिक प्रयत्नाची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (C M Uddhav Thackeray) यांनी दाखल घेत कौतुक केले आहे. (The Khadgaon Corona has been liberated through the collective efforts of the villagers at Gangakhed)
गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून तसेच वासुदेव, वाघ्या- मुरळी यांच्या माध्यमातून गावात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी, दवंडीचा उपयोग करावा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट गावात येणार की नाही हे कोरोनाला न ठरवू देता गावांनी यासंबंधीचा निर्णय घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, सततची सावधानता बाळगत नियमांचे पालन करावे आणि आपली गावे कोरोनामुक्त ठेवावीत असे आवाहन सरपंचांना केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास गंगाखेड तालुक्यातील खादगावने प्रतिसाद दिला. व कोरोनास दूर ठेवण्यात यश मिळवले. गंगाखेड शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील खादगाव या खादगावची लोकसंख्या २५०० इतकी आहे. खादगावचा बराचसा परिसर हा डोंगराळ भागांमध्ये येतो. परंतु नियोजनबद्ध सिंचनाच्या पद्धतीमुळे गतवर्षी पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध राहीला. यामुळे गावकऱ्यांनी आपला जास्ती वेळ शेतात घालवल्यामुळे एक प्रकारे नैसर्गिक विलगीकरणच झाले असे म्हणता येईल. गावकऱ्यांनी वज्रमूठ बांधत कोरोनापासून आपल्या गावाला दूर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला.
सर्वात प्रथम ग्रामपंचायतच्या वतीने गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. गावकर्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत सर्वांना सामाजिक दुरी राखण्याचे आव्हान केले गेले. गावात एकत्र न येता शेतामध्ये आप आपल्या शेतीपूरक व्यवसायामध्ये गुंतून राहण्याचा सल्ला देण्यात आला. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुणे, मुंबई वरून गावात आलेल्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, यांनी महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यातील कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करत विविध उपाय योजना राबवणाऱ्या सरपंचाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगावचा समावेश करण्यात आला. खादगावच्या सरपंच सावित्री राजेश फड यांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
अनेक मजुरांच्या हातचे काम गेल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य राजेश फड यांनी धान्याच्या कीटचे वाटप केले. या सर्व उपाययोजनामध्ये गावकऱ्यांनी सहकार्य करत गावाला कोरोना पासून दूर ठेवण्यात यश मिळवण्यात आले.
- सावित्री फड, सरपंच, खादगाव (ता. गंगाखेड, जि. परभणी)
(The Khadgaon Corona has been liberated through the collective efforts of the villagers at Gangakhed)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.