bus stop 
मराठवाडा

Chh. Sambhajinagar : बसस्थानकातील प्रवाशांची पळवापळवी थांबेना; एसटी प्रशासन-पोलिसांचेही दुर्लक्ष

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : एस. टी. बसस्थानकात पोलिस चौकी, एसटीचे सुरक्षारक्षक असतानाही प्रवासी पळविण्याचे प्रकार थांबत नाहीत. खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट आणि खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक आणि एजंट सर्रास बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. सिडको बसस्थानकातही अशीच अवस्था पाहायला मिळत आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांना पळविणाऱ्या खासगी एजंटांचा कायमचा बंदोबस्त करण्यास एसटी महामंडळाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात एजंटांची घुसखोरी सुरूच आहे. बसस्थानकाच्या आवारातून एसटीच्या प्रवाशांना खासगी बसचे एजंट पळवून नेतात.

दररोज हजारो प्रवासी पळविले जात असल्याने तोट्यात असलेली एसटी आणखी तोट्यात जात आहे. खासगी एजंटांचा बंदोबस्त करण्यास एसटी कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षकही अपयशी ठरत आहेत. या दलालांना धाकच नसल्याने ते थेट बसस्थानकात घुसून प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना अवैध वाहतुकीकडे ओढण्यासाठी दलालांकडून आमिषेही दाखविली जातात.

नो पार्किंग झोन नावालाच

एसटी बसस्थानकाच्या २०० मिटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. असे असतानाही या झोनमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनधारक प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत.

ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहनेही

एसटी बसस्थानकांच्या आवारात दिवसभर खासगी जीप, कार व अन्य वाहनधारक आणि त्यांचे एजंट प्रवाशांची पळवापळवी करतात तर रात्रीच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्सचालक व एजंट प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. त्यामुळेच दिवसभर एसटीच्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. पुणे येथे जाण्यासाठी अनेक एसटी बस रिकाम्या धावतात काही बसमध्ये दहा ते वीसपर्यंत प्रवासी असतात, तर दुसरीकडे खासगी वाहने मात्र भरभरून जाताना दिसत आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिक आणि पुण्यासाठी जाणारे प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या जाळ्यात अडकतात. तर सिडको बसस्थानकातून तर मोठ्या प्रमाणावर बीड, गेवराई, जालना, माजलगाव, परभणी, बुलडाणा, खामगाव अशा विविध शहरांसाठी खासगी कार, जीपमधून पळवले जात आहेत.

खंडपीठात याचिका

काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकिंगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला होता. त्यावेळी एका खासगी ट्रॅव्हल्स एजंटाने मध्यवर्ती बसस्थानकातून त्याचे अपहरण करून केवळ ५०० रुपयांसाठी त्याचा खून केला. या प्रकरणाच्या अनुषंगाने बसस्थानकावर पुरेशी सुरक्षा वाढवण्याची विनंती मुकेश भट्ट यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे त्या विरोधात त्यांनी ॲड. अक्षय लोहाडे व ॲड. संदेश हांगे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या निमित्ताने त्यांनी राज्यभरातील बसस्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT