this monsoon not beneficial for farmers water crisis crop rain jalna marathwada esakal
मराठवाडा

Jalna News : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेदना देणारा यंदाचा हंगाम

खेळणा, पूर्णा, जुई नद्यांना एकही पूर नाही ः पाणी टंचाईचे सावट, रब्बी संकटात

सकाळ वृत्तसेवा

यंदाचे वर्ष हे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळाच्या वेदना देणारे ठरले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. तालुक्यातील मोठ्या खेळणा, पूर्णा, जुई या नद्यांना यंदा एकही पूर गेलेला नाही.

भोकरदन शहरावर पावसाळ्यापासूनच पाणीटंचाईचे मोठे संकट असून शहरात महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत असल्यामुळे आतापासूनच शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे

दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे कोरडे ठाक पडले असून बाणेगाव येथील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकंदरीत तालुक्याची खरीप हंगामाची परिस्थिती देखील फारशी चांगली नाही तर रब्बी हंगाम येण्याची कुठलीच शाश्वती नाही.

भोकरदन शहरावर पावसाळ्यापासूनच पाणीटंचाईचे मोठे संकट असून शहरात महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत असल्यामुळे आतापासूनच शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नगर परिषदेने दानापूर येथील जुई धरणात पर्यायी व्यवस्था म्हणून चर खोदून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली मात्र तीदेखील पुरेशी झाली नाही.

मागील महिन्यापासूनच बाणेगाव येथील धरणातून टँकरद्वारे शहरासाठी पाणीपुरवठा होत असला तरी गावकरी व परिसरातील नागरिकांच्या विरोधाचा सामना प्रशासनास करावा लागला. नगर परिषदेने धामणा धरणातून पाणीपुरवठा संदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहेत.

गौरी गणपती व दसऱ्याच्या उत्सवांना दुष्काळाचे सावट दिसून आले. बाजारपेठेत देखील पुरेसा उत्साह नव्हता. झेंडूच्या फुलाची आवक देखील बऱ्या प्रमाणात असली तरी ग्राहक नसल्यामुळे बाजारपेठ शांत होती. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी देखील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी फारशी दिसून येत नाही. आठवडी बाजारांमध्ये देखील गर्दी मंदावत चालली असल्याचे चित्र आहे. दुष्काळाचा परिणाम प्रामुख्याने सध्या तरी कृषी साहित्य विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

बाजारपेठेवर परिणाम

दुष्काळाची दाहकता बघता विंधन विहिरींना मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात मागील वर्षाचा कापूस तसाच पडून आहे. वर्षभर थांबून देखील दसऱ्याला सात हजाराचाच कापसाला भाव असल्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहेत. सोयाबीनचा भाव देखील पाच हजाराच्या आतच असल्यामुळे उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले आहे. दसऱ्याला वाहन आणि सराफा बाजारात देखील दरवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या निम्म्यापेक्षा कमी दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT