परभणी : ब्राम्हणगाव फाटा (ता., जि.परभणी) येथून जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकमधून सोन्याच्या मण्याचे मोठे पाकीट बाहेर पडले आहे, वेचण्यासाठी चला, असे म्हणत अनेक जण ब्राम्हणगाव फाट्यावर पोचले. रस्ताभरून मणी पडलेले असल्याने ते वेचून घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडाली. या गर्दीमुळे या मार्गावरील वाहतूकही तुंबली. अनेकांनी घेता येतील तेवढे मणी वेचून घेतले व सोनाराचे दुकान गाठले. परंतु, तेथे गेल्यानंतर मात्र, या लोकांचा भ्रमनिरास झाला. कारण, हे सोने नव्हते; तर चक्क बेन्टेक्सचे मनी असल्याचे सराफा व्यापाऱ्याने सांगितले. या प्रकारामुळे मात्र परभणी - गंगाखेड मार्गावरील वाहतूक काही काळ तुंबली होती.
परभणी शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ब्राम्हणगाव आहे. या गावाच्या फाट्यावरून जाणाऱ्या ट्रकमधील एक मोठे पाकीट ट्रकमधून खाली पडले. रस्त्यावर पडताच ते फुटले व त्यातील हजारो मणी रस्त्यावर विखुरले गेले. हा प्रकार फाट्यावर बसलेल्या अनेकांनी पाहिला. त्यामुळे काय पडले हे पाण्यासाठी अनेकांनी रस्त्यावर गर्दी केली. रस्त्यावर सोन्याचे मनी पडल्याचे पाहून सर्वच जण आश्यर्यचकीत झाले. पाहता-पाहता अनेकांनी ते मनी उचलण्यासाठी एकच गर्दी केली.
हेही वाचा --वनविभागाच्या पथकावर वनमाफियांचा हल्ला
दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा
मग काय, रस्त्याने जाणारे प्रवाशीदेखील आपापली वाहने उभी करून मनी वेचण्यात दंग राहिले. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी जमल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली. अनेकांनी आपल्या जवळ असलेल्या कपड्यामध्ये, खिश्यात, महिलांनी साडीच्या पदरात मनी जमा करून घेतले. काही वेळाने रस्त्यावर पडलेले सोन्याचे मनी घेऊन काही जण सोनाराच्या दुकाना गेले, तेव्हा हे मनी सोन्याचे नसून सोन्यासारख्या दिसणाऱ्या बेन्टेक्सचे असल्याचे समजले व सर्वांचा भ्रमनिराश झाला.
अनेकांनी केले व्हिडीओ
सोन्याचे मनी गोळा करताना अनेक लोक रस्त्यावर बसलेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. काही हौसी लोकांनी हा प्रकार त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. यामुळे सोशल मीडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा पाहावयास मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.