file photo 
मराठवाडा

Video : आडत दुकानातून चार महिलांनी केले तीन लाख रुपये लंपास !

सकाळ वृत्तसेवा

पूर्णा (जि.परभणी) : येथील नवा मोंढा आडत बाजारातील श्रीराम ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानातील गल्ल्यातील तीन लाख रुपये चार महिलांनी मोठ्या शिताफीने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता.१७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

पूर्णा येथील नवामोंढा आडत लाईनमध्ये लक्ष्मीनारायण चितलांगे यांचे आडत दुकान आहे. या दुकानाचे मालक व मुनीम चहा पिण्यासाठी बाहेर गेल्याचे हेरून मंगळवारी (ता. १७ ) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चार महिला दुकानात शिरल्या व त्यांनी गल्ल्यातील तीन लाख रुपये चोरून पोबारा केला.

घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, ही बाब लक्षात येताच विशाल चितलांगे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे व शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरील घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा ...


पेडगावप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल
परभणी :
पेडगाव (ता. जि. परभणी) येथील दोन परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला ता.१८ फेब्रुवारी रोजी सुरवात झालेली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर शिक्षण विभागात केवळ एकमेकांना पत्र देत जबाबदारी ढकलण्याचे काम सुरू होते. कार्यवाही होत नसल्याने अश्चर्य व्यक्त होत होते.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली तक्रार
 शिक्षण विभागाच्या विरोधात ओरड झाल्यानंतर अखेर सोमवारी (ता. १६) गटशिक्षणाधिकारी अब्दुल सामी यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद शाळेतील केंद्रसंचालक सी. एम. रोपडेकर, सहायक केंद्रचालक आय. एम. सय्यद, तसेच बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्र संचालक के. एम. खिराडे, सहायक केंद्र संचालक एस. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास हवालदार राजेश राठोड, शिपाई साईनाथ रिठेवाड हे करीत आहेत.

हेही वाचा ... 

‘आयजी’च्या पथकाचा जुगारावर छापा


सोनपेठ (जि.परभणी) : शहरात सुरू असलेल्या अवैध व्यावसायांवर नांदेड येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १७) जुगारावर छापा टाकून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जुगाराचे साहित्य व रोख २२६० रुपये जप्त
नांदेड येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलिसांनी सोनपेठ शहरातील मटन मार्केट भागात सुरू असलेल्या अवैध व्यावसायावर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकून नागरिकांकडून बेकायदेशीररीत्या पैसे घेऊन त्यांना चिठ्या देऊन त्यांच्याकडून कल्याण नावाचा मटका जुगार घेत असताना प्रकाश पंचांगे व वैजनाथ कांदे यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख २२६० रुपये जप्त केले. तसेच दोन्हीही त्याच विशेष पथकाने आरोपींना अटक केले. पोलिसांनी कितीही प्रयत्न करूनही अवैध व्यवसाय सुरूच आहेत. तसेच स्थानिक पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही शहरातील अवैध मटका व्यवसाय चालूच असल्यामुळे सोनपेठ पोलिस त्यासाठी काय उपाययोजना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा ...

खासगी बसच्या धडकेत
दुचाकीस्वार गंभीर


मानवत (जि.परभणी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळील चौकात मंगळवारी (ता. १७) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
परभणी- पुणे प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस ( एमएच २३ - डब्यू ४१०२) साडेसात वाजण्याच्या सुमारास शहराजवळील गजानन महाराज मंदिराजवळ आली असता दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली.


या धडकेत प्रकाश दत्तराव सोरेकर (रा. मानवत) गंभीर जखमी झाले. वेगाने असणाऱ्या खासगी बस दुचाकीस्वाराला फरफटत रस्त्याच्या खाली घेऊन गेली. सोरेकर यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी साहायक पोलिस निरीक्षक भारत जाधव, नारायण ठमके, खरात यांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT