Pimpalgaon News: मार्च महिन्यातचं चित्तेपिपंळगाव ता . छत्रपती संभाजीनगर परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ,खोडेगाव ,कचनेर, घारदोन,काद्राबाद,लायगाव, पांढरी पिंपळगांव,सांजखेडा, भागातील शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन फळबाग वाचण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न आता असफल होतांना दिसत आहेत,यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका फळबागेतील मोसंबी बागेला बसताना पाहायला मिळत आहे. कारण यंदा मोसंबी सह अन्य फळबाग जगवणे अत्यंत जीकीरीचे ठरतं.
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरीने मार्च महिन्यातचं तळ गाठला होता ,आता विहिरी अक्षरक्ष कोरड्या पडल्या आहेत, आजपर्यंत विकतचे पाणी घेत बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला.
मात्र आता , हातात पैसा नसल्याने हतबल झालेला शेतकरी, मोसंबीच्या बागा डोळ्यात पाणी आणून तोडताना दिसत आहेत,छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव येथील शेतकरी उद्दलसिंग गुंसीगे यांनी त्यांच्या शेतात असलेल्या चारशे मोसंबीच्या झाडावर पाण्याअभावी कुऱ्हाड चालवली असुन ,विहिरीने तळ गाठले असल्याने , आता मोसंबीची बाग जगवणे शक्य नसल्याने, व विकतचे पाणी परवडत नसल्याने हा मोसंबीचा बाग तोडत असल्याचे गुंसीगे यांनी सांगितले.
आठ दहा वर्षांपासून मोठ्या कष्टाने मोसंबीचा बाग वाढवून जगवला लेकराप्रमाणे जीव लावून एक एक झाडं मोठी केली दहा वर्षांपासून या बागेतून त्यांना उत्पन्न देखील मिळत होते.
मात्र यंदा पाऊस अत्यंत कमी झाल्याने , विहिरीने मे महिन्यात तळ गाठले आहे.तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून, झाडे कशी जगवनार या परिस्थितीत गुंसीगे यांनी त्यांच्या शेतातील चारशे मोसंबीची झाडे पाण्याअभावी तोडून टाकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.