Aundha Nagnath Municipal Council Election  esakal
मराठवाडा

Hingoli : सेनगाव नगरपंचायतसाठी ३९.३१, तर औंढ्यात ६१.६६ टक्के मतदान

हिंगोलीतील सेनगाव व औंढा नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

विठ्ठल देशमुख, दत्तात्रय शेगूकर

सेनगाव/औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : नगरपंचायत निवडणुकीसाठी उर्वरित चार प्रभागा करिता एकूण १७२२ मतदार आहेत. मंगळवारी (ता.१८) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ३९.३१ टक्के मतदान पार झाले. पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी मतदान केंद्रावर भेट दिली आहे. सेनगाव नगरपंचायत (Sengaon) निवडणुकीत चार जागांसाठी येथील जिल्हा (Hingoli) परिषद प्राथमिक शाळेत चार बूथ केंद्रांवर मंगळवारी सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रभाग तीनमध्ये स्त्री २३२ आणि पुरुष २२९ एकूण ४६१, प्रभाग क्र.४ स्त्री १८० पुरुष १८७ एकूण ३६७, प्रभाग ५ स्त्री २०० पुरुष २१० एकूण ४१०, प्रभाग क्र.१५ स्त्री २३१ पुरुष २५३ असे एकूण चार प्रभागात १७२२ मतदार आहेत. थंडीच्या कडाक्यामुळे साडेनऊ वाजेपर्यंत केवळ १३.८२ टक्के मतदान झाले होते. (Today Sengaon And Aundha Nagnath Municipal Council Election)

मात्र दहा वाजता नंतर मतदानाचा टक्का वाढत गेला. आणि साडेअकरा वाजेपर्यंत १७२२ पैकी ६७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आचारसंहिता संपल्यापासून मागच्या दोन दिवसांत पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. मतदानाच्या दिवशी एसआरपीची तुकडी तैनात करण्यात आली. पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. आता सायंकाळी पाच वाजतापर्यंत किती मतदान होणार आणि हे पाहणे गरजेचे आहे. उमेदवारांकडून मतदारांना विनवणी केली जात आहे. मात्र मतदार नेमके कुणाला कौल देतात हे चित्र उद्या स्पष्ट होईल.

औंढा नगरपंचायतीसाठी दुपारपर्यंत ६१.६६ टक्के मतदान

औंढा नागनाथ नगरपंचायत (Aundha Nagnath) उर्वरित चार जागेसाठी मंगळवारी गुलाबी थंडीमध्ये ही मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, युवक यांनीही मतदान केले. चार जागेसाठी हे मतदान होते. गलांडी या ठिकाणी उमेदवार शंकर शेळके यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. तर प्रभाग १० मध्ये उमेदवार दीपाली पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरांमध्ये चार मतदान केंद्र असून दुपारी दोन वाजेपर्यंत ६१.६६ टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन जयस्वाल यांनी दिली. आनंदमय वातावरणामध्ये चार मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT