file photo 
मराठवाडा

रस्त्यात फसला लोडिंग ट्रक अन् वाहतुकीचा झाला खोळंबा 

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कारेगाव रस्त्यावरील पाण्याची टाकी ते उघडा महादेव दरम्यान, सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला लोडिंग ट्रक रविवारी (ता. दहा) फसल्याने वाहतुकीस खोळंबा झाला, तर रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास फसलेला ट्रक दुपारी अडीच वाजता  फसलेला ट्रक मोठ्या महतप्रयासानंतर काढण्यात चालकास यश आले. नवामोंढा पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत करीत विनाकारण फिरणाऱ्यांना समज दिली. 
उघडा महादेव परिसरात रविवारी सकाळी महापालिकेने पाणी सोडले होते. सकाळी नऊच्या सुमारास पाणी आल्याने रस्त्यावर पाणी साचलेले होते. याच वेळी तेथून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेलाल भलामोठा लोडिंग ट्रक (एमएच १८ - एम ३६००) एमआयडीसीकडे जात होता. मात्र, पाण्याच्या टाकीपासून पुढे उघडा महादेवकडे जात असताना रस्त्याच्या मधोमध फसला. ट्रकचे मागील चाक पूर्णतः फसल्याने ट्रक मागे - पुढे काही होत नव्हता. फार वेळा ट्रक सुरू करत काढण्याचा प्रयत्न चालकाने सुरू केला. यामुळे दुतर्फा ये-जा करणाऱ्या नागरिकांची, वाहनांची गर्दी झाली. परिणामी, ट्रकचालकाने सिमेंटने भरलेला लोडिंग ट्रक आधी रिकामा करणे सुरू केले. अर्धेअधिक सिमेंटची पोती खाली काढल्यानंतर फसलेल्या जागी दगड, विटा टाकून काढण्याचे मोठे प्रयत्न केले.

तब्बल चार तास प्रयत्न नंतर यश
एमआयडीसीकडे जाणारा हा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. सध्या लॉकडाउनमुळे अकरावाजेपर्यंत व्यवहार चालू ठेवावयाचे असल्याने साडेअकरा ते बाराच्या सुमारास गावातून आपापले व्यवहार आटोपून, भाजीपाला, किराणा घेऊन येणाऱ्यांची संख्या अधिक असते. रस्त्याच्या मधोमध भलामोठा ट्रक फसल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचण होऊ लागली होती. त्याच वेळी नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, कर्मचारी वैजनाथ तांबोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वाहतूक सुरळीत करीत विनाकारण तेथे उभ्या असलेल्यांना सर्वप्रथम हटविले. तसेच ट्रकचालकासह कामगारांना ट्रक काढण्यासाठी मदत केली. तब्बल चार तास प्रयत्न केल्यानंतर फसलेला ट्रक काढण्यात चालकास यश आले. त्यानंतर पुन्हा सिमेंटची पोती त्यात भरून ट्रक पुढे मार्गस्थ झाला.

हेही वाचा व पहा : Video : परभणीला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा

लोडिंग वाहनांना पायबंद घालण्याची गरज
पाण्याच्या टाकीपासून उघडा महादेव व पुढे एमआयडीसीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा मुख्यतः वापर केला जातो. छोट्या-मोठ्या वाहनांसह वसाहतीतील नागरिक रस्त्याचा वापर करतात. मात्र, लोडिंग वाहनांच्या दळववळणासाठी हा रस्ता नसतानाही अनेक लोडिंग वाहने येथून ये-जा करीत आहेत. यामुळे रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. छोटे अपघात तर नित्याचेच झाले असल्याचेही रहिवाशी सांगत आहेत. तसेच लोडिंग वाहनांना पायबंद घालणे आवश्यक असून महापालिकेने रस्त्याची डागडुजीही तातडीने करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT