परभणी ः येथून देगलूर जाणाऱ्या बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या जागी उभे राहून प्रवास करीत आहेत. 
मराठवाडा

मान-पाठ एक करणारा असाही प्रवास...

राजन मंगरूळकर

परभणी : एकीकडे गुरुवारपासून पूर्णा ते नांदेड दरम्यान पुढील बारा दिवस दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे, तर सध्या परभणीत सय्यद शाह तुराबूल हक्क यांचा उरूस सुरू आहे. उरुसाची गर्दी आणि दुपारच्या बंद रेल्वेमुळे नांदेड जायला केवळ बसचा प्रवास हाच पर्याय आहे. याची नामी संधी ओळखून महामंडळातर्फे ज्यादा बस सोडणे अपेक्षित होते, मात्र दोन दिवसांत तसे काही दिसले नाही. आधीच महामार्गावर सुरू असलेले काम आणि लांबपल्याच्या बसची वाट पाहून त्यात करावा लागणारा उभ्याने प्रवास हा प्रवाशांसाठी मान-पाठ एक करणारा ठरत आहे.

परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वे प्रवासाचे दुहेरीकरण काम अंतिम टप्प्यात आहे. यात लिंबगाव ते पूर्णा, पूर्णा ते मिरखेल हे ३२ किलोमीटरचे काम नॉन इंटरलॉकिंग आणि रूळ जोडणीसाठी सुरू केले आहे. ते काम १८ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ११ ते संध्याकाळी पाचपर्यंत चालणार आहे. यामुळे बसेसला गर्दी वाढली आहे तर बसेसची संख्या मात्र कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.  

मिळेल त्या बसने प्रवाशांचे मार्गक्रमन 
परभणी येथून सकाळी पुषपुल सवारी रेल्वे नांदेड गेल्यावर दुपारी दोन ते चारच्या मध्ये परभणीत येणाऱ्या सचखंड, नरसापूर या रेल्वेची वाट पाहणे हाच एक पर्याय आहे. त्यातच दुपारी १२ ते एकच्या दरम्यान, काचीगुडा, नांदेड या सवारी रेल्वे केवळ परभणीपर्यंत येत असल्याने पुढे नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली जाणारे सर्व प्रवासी परभणी बस स्थानकात उतरून मिळेल त्या बसने नांदेड, झिरो फाटा मार्गे पूर्णा, औंढा, हिंगोली गाठत आहेत. अशा वेळी परभणी एसटी महामंडळाच्या वतीने जादा बसेस दुपारी १२ ते पाचच्या दरम्यान परभणी ते नांदेड, हिंगोली, वसमत अशा शटल सेवा सुरू करणे गरजेचे आहे. बसमध्ये जागा मिळणे तर सोडा, साधे उभे राहणेही कठीण होऊन बसले आहे.

पूर्णा तर अजूनही बसने जोडलेला नाही
परभणी येथून पूर्णा जाण्यास रेल्वे हाच एकमेव मार्ग असल्याचे अनेकांना या मार्गावर बस उपलब्ध नसल्याचे माहीत झाले आहे. जेव्हा रेल्वे बंद, तेव्हा पूर्णा जाणारे अनेक जण राज्य रस्ता मार्गे झिरो फाटा आणि तेथून पूर्णा आपल्या वाहनाने जातात. हा रस्ता एखाद्या महामार्ग रस्त्याला लाजवेल असा आहे बर का ? सध्या परभणी ते नांदेड जाणारे अनेक वाहनधारक, दुचाकी, मालवाहू वाहने वसमत मार्गाची दुरुस्ती आणि खड्डे असल्याने पूर्णा मार्गे नांदेड जातात; पण महामंडळ परभणी विभाग काही पूर्णा झिरो फाटा मार्गे बस का सोडत नाही, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

अतिरिक्त बस किंवा शटल सेवा सोडावी
सध्या परभणी बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि बीओटी तत्वावर बांधकाम केले जात आहे. यामुळे जुने बस स्टँड पाडून तेथे मोकळ्या जागेत पत्र्यांचे शेड टाकून बस सोडल्या जात आहेत. येथे असलेली उपलब्ध जागा आणि प्रचंड प्रमाणात असलेली धूळ पाहता प्रवाशांना आलेली बस शोधणे आणि त्यात कसरत करून जागा पकडणे, अशी कामे करावी लागत आहेत. यात वाढलेले प्रवासी आणि बाहेर गावांवरून आलेल्या बसचा सहारा घेण्याची वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, कंधार, बिलोली, भोकर या बस दुपारी १२ ते दोनच्या मध्ये परभणीत औरंगाबाद येथून येतात. त्या आधीच खचाखच भरून येतात. मग अशा वेळी उभे राहून, धक्के खात, खड्डे सहन करत हा प्रवास पार करावा लागतो. यासाठी परभणी विभागाने लातूर, बीड, सेलू, पाथरी, जिंतूर, गंगाखेडप्रमाणे नांदेड येथे दर अर्ध्या तासाला बस सोडावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

उरुसाला येणारे भाविक वाढले
परभणी येथील सय्यद शाह तुराबुल हक्क यांच्या दर्ग्याला दर्शनासाठी परभणीसह परजिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने येतात. सध्या नांदेडसह पंढरपूर, निझामबाद, दौंड अशा अनेक रेल्वे बंद आहेत. अशा वेळी बसचा पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे. केवळ शहर आणि आजूबाजूच्या गावखेड्यांतून बस सोडण्याऐवजी इतर ठिकाणांहून बस सोडल्यास महामंडळच्या उत्पनात भर पडेल. रेल्वेच्या ब्लॉकचा फायदा आर्थिकदृष्ट्या महामंडळने करून प्रवासी वर्गाला पर्याय उपलब्ध करून द्यावा, एवढेच! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT