File photo 
मराठवाडा

कोरोना इम्पॅक्ट : इतिहासजमा खजिनाच येतोय जोडीला

विश्वनाथ कहाळेकर

नांदेड :  आपण शाळेच्या अभ्यासक्रमात इतिहास हा विषय अभ्यासत असतो. त्यात होऊन गेलेल्या राजा-महाराजांच्या गोष्टी आपण वाचतो. त्यात घोडदौड, त्याचा आहार, जीवनशैली अनुभवावयास मिळते. त्या काळी आजच्या प्रगत विज्ञानाचे दर्शन होत नसले तरी त्यांचे जीवन व आरोग्य सुखी, संपन्न होते हे मात्र खरे. कारण त्या काळी शरीरिक कष्टासह आयुर्वेदिक औषधींवर तसेच पोषक खद्यपदार्थांवर जास्त भर होता.

कालांतराने वैज्ञानिक क्रांतीमुळे हळूहळू मानवाने विज्ञानात प्रगती केली. त्यामुळे अनेक इतिहासजमा गोष्टी केव्हाच लुप्त झाल्या आहेत. कृत्रिम शेतीमुळे पीक उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसाठी रासायनिक खत, बियाणांचा वापर सुरू केला. त्यामुळे उत्पादन वाढले. मात्र, पिकांतील पोषक अन्नद्रव्य कमी झाले. वेगवेगळ्या यंत्रनिर्मितीमुळे मानवाचे शारीरिक कष्ट कमी झाले. त्यामुळे मानवाच्या शरीराची रचनाच बदलत गेली व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. मानव वेगवेगळ्या कृत्रिम, चायनिज खद्यपदार्थांकडे वळला. त्याला शेंद्रिय खद्यपदार्थ मिळणे कठीण होत गेले. या जिवनशैली बदलाचा सर्वात मोठा फटका हा आरोग्याला बसत आहे.

अडगळीतली खेळणी निघाली बाहेर
‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आज संपूर्ण देश लॉकडाउन आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या घरीच राहण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. त्यामुळे विज्ञानाच्या धावत्या युगात गुरफटलेल्या मानवाला थोडासा आराम मिळाला आहे. तसेच कोरोनाच्या भीतीने बाहेरील अन्नपदार्थ खरेदी - विक्रीवरही बंदी घालण्यात आली असून लोकही ते घेण्यास टाळत आहेत. घरातच बसून असल्यामुळे लोक आजघडीला इतिहासजमा खेळ खेळण्यात मग्न झाल्याचे चित्र आहे. जसे की, दोरी खेळणे, झोका खेळणे, चंपुल खेळणे, मुलांना पाठीवर घेऊन घोडा- घोडा खेळणे, कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी आदीप्रकारचे खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

इतिहासजमा गोष्टीच पुन्हा जीवनात
लॉकडाऊनमुळे मांसाहाराची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, डाळी, दूध याचाच उपयोग आहारासाठी सर्वच जण करीत असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच कोरोनाच्या भितीने का होईना लोक आज विज्ञानाला विसरून इतिहासजमा गोष्टींचाच प्रत्यक्ष जीवनात वापर करीत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT