Turmeric esakal
मराठवाडा

Hingoli | हळदीला मिळतोय आठ हजार ५०० रुपये भाव, शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीने पुन्हा एकदा चांगली झळाळी घेतली आहे.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीने पुन्हा एकदा चांगली झळाळी घेतली आहे. हळद शेतकऱ्यांना (Farmer) पिवळे करणार यात शंका नाही. हळद खरेदीसाठी हिंगोलीची बाजारपेठ (Hingoli) सर्वदूर परिचित आहे. बुधवारी (ता.आठ) बाजार समितीत विदर्भासह मराठवाड्यातून (Marathwada) मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. मंगळवारी हळदीचे दर ८५०० रुपयापर्यंत होते. यामुळे आवक वाढली आहे. हिंगोलीत बुलडाणा, औरंगाबाद (Aurangabad), परळी आदी ठिकाणाहून वाहने दाखल झाली आहेत. बुधवारी चार हजार (Turmeric Market) पोत्यांची अवक झाल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे. येत्या काही दिवसांत हळदीचे दर वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. (Turmeric Price)

हळदीचे वाढलेले दर पाहता हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये दुरवरचे शेतकरी हळद घेऊन विक्रीसाठी आले होते. यामुळे वाहनांच्या लांबच लांबच रांगा बाजार समिती परीसरात लागल्या होत्या. मराठवाड्यासह इतरही राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीने हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचाच परिणाम भाववाढीवर दिसत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT