file photo 
मराठवाडा

मरकजमधील ‘ते’ बारा जण पुन्हा क्वारंटाईन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दिल्लीच्या मरकजमधून इंडोनेशिया व दिल्ली येथून येऊन नांदेडात लपून बसलेल्या तबलीगी जमातीच्या १२ जणांना इतवारा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. या सर्वांची कोरोना तपासणी निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना १४ दिवसांनी पुन्हा ताब्यात घेतले. सध्या त्यांना येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयात सुरक्षेच्या दृष्टीकोणातून क्वारंटाईन केले आहे. लवकरच या सर्वाना नांदेड न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक साहेबरवा नरवाडे यांनी सांगितले. 

दिल्ली येथील मरकजमधून आलेल्या इंडोनेशिया देशातील दहा जण व दिल्ली येथील दोघेजण अशा बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना शासकिय रुग्णालयात क्वारंटाईन केले. या सर्वाची कोरोना तपासणी ही निगेटिव्ह आली. त्यानंतर प्रशासनासह नांदेडकरांनी सुटकेचा नि: श्‍वास टाकला होता. मात्र आमच्या धर्मुगूरुना रुग्णालयात विनाकारण टाकत असल्याचे निमित्त पुढे करुन मोठा जमाव इतवारा पोलिस ठाण्यावर चालून आला होता. पोलिसांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. 

वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून

मात्र पोलिसांनी त्यांचा दबाव झुगारून अखेर जमावावरव त्यानंतर या बारा जणांवर सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डाके यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला होता. यावेळी इतवारा पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी भेट देऊन प्रकरण संययमाने हाताळले.  

एसआयडी, गुप्त वार्ता, जिवीशा नावालाच

संबंध जगात कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र आपल्या जिल्ह्यात बाहेर देशातील तबलीकी जमातीचे लोक कसे व कुठून आणि कधी आले. कुठे राहत होते याचा एसआयडी, गुप्त वार्ता, आणि जिल्हा विशेष शाखेला माहित नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिसांच्या गुप्तविभागाला याबद्दल काहीच माहिती नसल्याने त्यांच्या सेवेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या तिन्ही विभागांतर्गत समन्वयाचा अभाव असल्याने हे फार मोठे गंडातर नांदेड पोलिसांच्या डोक्यावर आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT