फोटो 
मराठवाडा

चोरट्याकडून दोन दुचाकी व ११ मोबाईल जप्त  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून दुचाकी पळविणे आणि आठवडी बाजारात घुसून मोबाईल लंपास करणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून दोन दुचाकी आणि ११ मोबाईल असा पावणेदोन लाखाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी केली. 

शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी व मोबाईल चोरांनी डोके वर काढल्याने पोलिसांची झोप उडाली होती. दररोज या घटना घडू लागल्याने नागरिक व वाहनधारक भयभीत झाले होते. वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळावे यासाठी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी सर्व ठाणेदारांना सक्त सुचना दिल्या आहेत. शहरातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची धरपकड करत मोबाईल व दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्न करावे अशा सुचना दिल्या. यावरून एकीकडे स्थानिक गुन्हे शाखा तर दुसरीकडे पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक (डीबी) यांना कामाला लावले. पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांच्या पथकाने आपल्या हद्दीत हैदोस घालणाऱ्या मोबाईल व दुचाकी चोरांना पकडण्यासाठी शहरात गस्त वाढविली. 

चोरट्याकडून पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

या गस्तदरम्यान त्यांच्या हाती अट्टल चोरटा उदय भगवान हातागळे (वय २५) रा शिवनगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ८५ हजाराच्या दोन दुचाकी आणि विविध कंपनीचे ८७ हजाराचे ११ मोबाईल असा एक लाख ७२ हजाराचा ऐवज जप्त केला. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे श्री. फस्के यांनी सांगितले. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी उदय हातागळे याला न्यायासलयासमोर हजर केले. यावेली न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.  यापूर्वीही शिवाजीनगर गुन्हे शोध पथकानी एका मोबाईल चोराला पकडून त्याच्याकडून ८८ हजाराचे पाच मोबाईल जप्त केले होते. पथकाचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के यांनी कौतूक केले.


नागरिकांनी सतर्कता पाळावी

गर्दीच्या ठिकाणी आपेल वाहन पार्कींगमध्येच लावावे. आपल्या वाहनाचे हॅन्डललॉक लागले की नाही याची खार्ती करावी. तसेच बाजार करीत असतांना किंवा रस्त्यावरून जाताना कानाला फोन लावून बोलत जावू नये. फारच महत्वाचे काम असले तर रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलावे. जेणेकरून मोबाईल चोरांची हिंम्मत होणार नाही. त्यासाठी आपण सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले. 
- अभिजीत फस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर), नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT