उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा (Umarga) शहरापासुन सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लातूर महामार्गालगत हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरुदेव मंदिरातील (Birudev Temple) दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी जवळपास साठ हजाराची रक्कम पळविली. गुरुवारी (ता.सहा) पहाटे चारच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास उस्मानाबादहुन (Osmanabad) श्वानपथक व ठसे तज्ज्ञांचे पथकानी तपासणी केली. या बाबतची माहिती अशी की, बिरूदेव मंदिराच्या भव्य इमारतीत बिरूदेव आणि महालिंगराया असे दोन देवांचे दोन वेगवेगळे मंदिर असून त्या दोन्ही मंदिरासमोर दोन लोखंडी दानपेट्या आहेत. (Two Donation Boxes Looted In Birudev Temple In Umarga Of Osmanabad)
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भक्त त्या दोन्ही दान पेटीमध्ये दहा, वीस रूपये तसेच चिल्लर पैसे दान म्हणुन टाकतात. या दोन्ही दान पेटीमध्ये अंदाजे साठ हजार रुपये जमा झालेले असावेत. मंदिराचे पुजारी बालाजी दिनकर घोडके यांनी बुधवारी (ता. पाच) रात्री साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास नित्य नियमाप्रमाणे दोन्ही मंदिर स्वतः बंद करून मंदिर इमारतीत झोपले. त्यांच्यासह पाच ते सहा जण झोपलेले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यानी दोन्ही लोखंडी दानपेट्या उचलुन मंदिरालगतच असलेल्या दुसऱ्या वाड्यात दरवाज्याजवळ नेल्या. पेट्या वजनदार असल्याने जवळपास पाच ते सहा चोरटे असावेत. त्यांनी पेट्याचे कुलुप व पत्रा तोडून आतील जवळपास साठ हजाराची रक्कम पळविली. पुजारी घोडके पहाटे सव्वाचारच्या सुमारास उठल्यानंतर मंदिरासमोर ठेवलेल्या दोन्ही दानपेट्या दिसुन आल्या नाहीत. या संदर्भात माजी नगरसेवक मधुकर घोडके यांनी पोलिसांना माहिती सांगितली. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद घटनास्थळी गेले. दरम्यान उस्मानाबाद पोलिसांचे श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानाने चौरस्त्याकडचा मार्ग दाखवला आहे. पुजारी बालाजी घोडके यांनी फिर्याद दिली आहे.
चोरट्यांचे धाडस वाढले !
उमरगा शहर व परिसरात दुचाकी चोरीसह घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. वेळ अमावस्या दिवशी दिवसा पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. आता तर चोरट्यांनी मंदिराकडे मोर्चा वळविला आहे. बिरूदेव मंदिरात पाच ते सहा व्यक्ती असताना मोठ्या धाडसाने दानपेट्या उचलुन त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रकार घडला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.