Farmer Death sakal
मराठवाडा

Lightning : अंगावर वीज पडल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चाकूर - वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना महाळंगी (ता. चाकूर) येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. झाडे उन्मळल्यामुले घर, काही वाहनांचे नुकसान झाले आहे.

महाळंगी परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी शिवाजी नारायण गोमचाळे (वय ३५) व ओंकार लक्ष्मण शिंदे (३०) हे शेतात होते. अंगावर वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी अनुपमा निंबाळकर, तलाठी विष्णू वजिरे यांनी पंचनामा केला. दोघांचे मृतदेह जानवळ येथील आरोग्य केंद्रात पाठविले.

दरम्यान, महाळंगी परिसरात वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली. झाड पडल्यामुळे घराची पडझड झाली. झाड पडल्यामुळे एका ऑटोचेही नुकसान झाले आहे. खांब पडल्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

शिवणखेड येथे प्रभू रामा कोंपले यांच्या मालकीच्या म्हशीवर बाभळीचे झाड पडले. त्यात ती दगावली. झरी खुर्द येथील गणेश सूर्यवंशी यांची दोन एकर क्षेत्रावरील केळीची बाग वादळाने आडवी झाली. त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT