Accident News sakal
मराठवाडा

Accident : तासिका करून परतत असताना दुचाकी एसटीला धडकली, दोन विद्यार्थी गंभीर जखमी

भास्कर सोळंके

जातेगाव (जि. बीड) - तासिका करुन दुचाकीवरुन गावाकडे परत जात असताना समोरुन येत असलेल्या एसटीला दुचाकी धडकल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी पाथर्डी-विशाखापट्टमण राष्ट्रीय महामार्गावरील सिरसदेवी जवळील रुई फाटा येथे घडली.

करण गणेश उनवणे (वय १८)व कृष्णा अनिल लोखंडे(वय १९) रा.रुई ता गेवराई असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नावे आहेत.दहावी नंतरचे शिक्षण घेत असल्याने निट,सीईटी तयारी करिता हे विद्यार्थी सिरसदेवी येथे एका खासगी कोचिंग लावले असल्यामुळे नेहमीप्रमाणे गणेश आणि कृष्णा कोचिंग संपल्याने सिरसदेवी येथुन पाथर्डी-विशाखापट्टमण राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरुन रुईला जात असताना, समोरील येत असलेल्या माजलगाव-पुणे बसला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील गणेश उनवणे, कृष्णा लोखंडे गंभीर जखमी झाले.

जखमी विद्यार्थ्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT