two women killed after Crushed by speeding pickup near Chandansawargaon on kej-Ambajogai road marathi news  
मराठवाडा

भरधाव पिकअपने चिरडले, दोन महिला जागीच ठार; केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव जवळील घटना

रामदास साबळे

केज, ता.२४ (बातमीदार): लघुशंका उरकून रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या पिकअपने दोन महिलांना चिरडल्याचा भीषण प्रकार नुकतेच समोर आला आहे. या भीषण अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२३) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव जवळील हॉटेल मोर्या समोर घडली. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये वंदना बाळु भंडारे (वय-४३) रा. मुडेगाव, ता.अंबाजोगाई व कमल केशव होळकर (वय-३१) रा‌. जवळगाव, ता. अंबाजोगाई यांचा समावेश आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील वंदना भंडारे व जवळगाव येथील कमल होळकर या आपल्या नातेवाइकांसह पुणे येथे असलेल्या भावाच्या घराच्या वास्तू शांतीच्या कार्यक्रमासाठी एका वाहनातून जात होत्या.

प्रवासादरम्यान त्यांचे वाहन अंबाजोगाई-केज रस्त्यावरील चंदनसावरगाव शिवारातील मोर्या हॉटेल जवळ लघुशंकेसाठी थांबविले होते. वाहनात सोबत काही पुरुष असल्याने या दोन महिला रस्ता ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्या होत्या. लघुशंका उरकून त्या परत त्यांच्या वाहनाकडे येताना केज शहराच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या पिकअपने दोघांनाही चिरडून निघून गेला.

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही महिलांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. अपघात घडताच काही क्षणातच जवळच असलेल्या नातेवाईकांनी त्या दोघींनाही केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रूग्णालयात नेताच डॉ.समाधान घुगे यांनी वैद्यकीय तपासणी करून दोघीही मयत झाल्याचे घोषित केले. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमजद सय्यद व पोलीस हवालदार आतार हे घटनास्थळी दाखल झाले होते. सोमवारी दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातातील पसार झालेल्या पिकअपचा पोलीस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT