फोटो 
मराठवाडा

माहूर येथे अॅटो अपघातात दोन महिला ठार

बालाजी कोंडे

माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदीरला जाणाऱ्या घाटातील एका वळणावर टमटम ॲटोचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला ॲटोची पलटी झाली. ही घटना रविवारी (ता. दोन) सकाळी साडेसात वाजता घडली. या अपघातात पोटा (ता. हिमायतनगर) येथील दोन महिला भाविक ठार झाल्या आहेत. या अपघातात सहा भाविक जखमी झाले असून गंभीर जखमीना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

काकडा आरती करून घराकडे परतत होते

आष्टी (ता. हदगाव) येथुन शेकडो भाविक माहूर गडावर पायी दिंडीने आले होते. रविवारी (ता.दोन) पहाटे श्री दत्त मंदीर येथे काकडा करून आपल्या गावाकडे परतीसाठी निघाले असता श्री रेणुकादेवी ते माहूर घाटात अॅटोला (एमएच-२६-एसी-४७६२) अपघात झाला. अपघातात सरस्वती सुभाष माने (वय- ५०) रा. पोटा (ता. हिमायतनगर) या ठार झाल्या आहेत.

पोटा (ता. हिमायतनगर) गावावर शोककळा

जखमीत सुमीत्रा आनंदराव सुर्यवंशी (वय- ४५), शोभाबाई दिगांबर सुर्यवंशी (वय- ५०), इंदुबाई किसन माने (वय- ५०), आशाबाई उत्तमराव माने (वय- ३५), धनश्री संतोष वालेगावकर (वय-३५), परगाबाई नारायण वालेगावकर (वय- ७) सर्व राहणार पोटा ता. हिमायतनगर या महिला जखमी झाल्या आहेत. यातील इंदुबाई माने व आशाबाई माने यांना तातडीने नांदेड येथे हलविण्यात आले आहे. परंतु उपचारादरम्यान इंदूबाई माने (वय ५०) हिचा मृत्यू झाला. बाकी जखमीवर उपचार सुरू आहेत.

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली जखमीची भेट

उर्वरीत जखमी भाविकांना तातडीने माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मोरे यांनी प्राथमिक उपचार केले. घटनेची माहीती मिळताच नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची व नातेवाईकांची विचारपूस केली.

ॲटोचालकावर गुन्हा दाखल

पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख, पोलीस उपनिरिक्षक शरद घोडके, पोलीस जमादार श्री राठोड, पोलीस कर्मचारी लिंगायत, सुशिल राठोड यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. अपघात झाल्या नंतर अॅटोचालक घटनास्थळावरून पसार झाला. मयत सरस्वती माने हिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून दुपारी नातेवईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी ॲटोचालकाविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार शरद घोडके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT