Youth Death in Accident Sakal
मराठवाडा

Accident : मोटार सायकलवरील सुटला ताबा! अपघातात दोन युवकांचा झाला मृत्यू

मोटार सायकलवरील ताबा सुटून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या त्या युवकाचा एक आठवड्यानंतर उपचारा दरम्यान निधन झाले आहे. या अपघातात यापूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

सुधीर कोरे

जेवळी, ता. लोहारा - मोटार सायकलवरील ताबा सुटून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या युवकाचा एक आठवड्यानंतर उपचारा दरम्यान निधन झाले आहे. याच अपघातात यापूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. आता या अपघातात मृत्यू झालेला आकडा हा दोन झाले असून हा अपघात २६ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास जेवळी पूर्व तांडा (ता. लोहारा) येथे झाला होता.

याबाबत माहिती अशी की २६ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास जेवळी (ता. लोहारा) येथील सुरज सत्येश्वर हिप्परगे (वय २३) व फत्रू इसराइल पटेल (वय २४) हे दोघे मित्र (एम.एच.२५ ए.वाय. २५५३) या मोटरसायकलने जेवळी पूर्व तांडा येथे जात होते.

येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वेगामुळे मोटार सायकल स्वारचा ताबा सुटून बाजूच्या खड्ड्यात जाऊन मोटरसायकल पडल्याने मोटार सायकल चालक सुरज हिप्परगे व पाठीमागे बसलेला फत्रू पटेल हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने दोघांनाही उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले होते. २७ मार्चला पहाटे सुरज हिप्परगे या युवकाचा उपचारादरम्यान निधन झाले.

तर मृत्यूची झुंज देत असलेल्या फत्रू पटेल यांचेही अखेर एका आठवड्यानंतर सोमवारी (ता.५) पहाटे जीवन ज्योत मावळी. सुरज हा अविवाहित असून आधुनिक तंत्राद्वारे कुपनलिकेतील मोटार काढणे- बसवण्याचा व्यवसाय होता. तर फत्रू याच एक वर्षापूर्वीच विवाह झाला आहे. त्याचे स्वतःचे दोन ट्रॅक्टर असून ट्रॅक्टर- यंत्राद्वारे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात भाडेपट्टीवर काम करीत होता. या दोघां कष्टाळू युवक मित्रांचे अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT