सुमीत सिरसाट व सुजित राऊत  
मराठवाडा

घरी परताना घात! दोघा तरुणांचा मृत्यू, प्रशिक्षणार्थी पोलिस जखमी

रामदास साबळे

केज (जि.बीड) : शहराच्या (Keij) मध्यवर्ती भागातील कानडी रस्त्याजवळ बुधवारी (ता.२२) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई जखमी झाला आहे. सुजीत सुरेश राऊत (वय २०) व सुमीत संदीपान सिरसाट (वय १८) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. शहरातील फुले नगर (Beed) येथील सुजीत राऊत, सुमीत सिरसट व गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण घेत असलेले समतानगर येथील विजयकुमार पांडुरंग घोळवे हे तिघे बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास (Accident In Beed) दुचाकीवरून (एमएच-४४/एम-२३०३) घराकडे जात होते. ते शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असलेल्या केज-बीड महामार्गावर कानडी रस्त्यावरील कांचन मेडिकल समोर आले असता एका अज्ञात वाहनाने मागील बाजूने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात सुजीत राऊत व सुमीत सिरसट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर विजयकुमार घोळवे यांच्या उजव्या पायाला व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दुचाकीला मोटारसायकल सुमारे शंभर-दीडशे फूट अज्ञात वाहनाने फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक‌ संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रमेश सानप, बाळासाहेब अहंकारे व चालक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह व जखमीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात मध्यरात्री उशीरा झाल्याने त्यावेळी प्रत्यक्षदर्शी कोणीच नसल्याने हा अपघात नेमका कसा घडला हे जखमी असलेल्या विजयकुमार घोळवे याच्या जबाबावरून उघडकीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT