उदगीर: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक असलेल्या आरोपीकडून पकडण्याचा दिल्या गांजाचा अधिक तपास करून ७६ लाख रुपयाचा ३०४ किलो गांजा पकडला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून दिलेली अधिक माहिती अशी की उदगीर ग्रामीण पोलिसांच्या वतीने बुधवारी (ता.२) दोन किलोचा गांजा पकडला होता.नमुद गुन्हयामध्ये दोन किलो गांजा तसेच पांढ-या रंगाची हुंडाई कार एकूण किंमत दोन लाख पन्नास हजार असे जप्त करण्यात आले होते. नमुद गुन्हयामध्ये आरोपी नामे अमोल ज्ञानोबा गोरे रा वडवळ नागनाथ जि लातुर तसेच एक महिला आरोपी यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवून पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी असलेले एकूण चार पथके तयार करून तपासाचे आदेश देण्यात आले होते. तपासा दरम्यान आरोपी अमोल गोरे याची कसून चौकशी केली असता त्याने नमुद माल हा महिला आरोपी व त्यांच्यामध्ये भागीदारी करून आणल्याचे सांगितले. नमुद आरोपीतास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, दिनांक जप्त करण्यात आलेल्या दोन किलो गांजाचे एक पॉकेट हे सॅम्पल पॉकेट होते लातुर, नांदेड, नाशिक येथील गांजा विकणा-या लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी त्याचा उपयोग करत होते.
नमुद आरोपीला कसोसीने प्रयत्न करून, कौशल्यपुर्ण व तांत्रिक सहाय्याची मदत घेवून विचारपूस केली असता नमुद आरोपीताने सांगितले की, गांजाचा ईतर मुद्देमाल हा आम्ही तेल भरण्याच्या टँकर मध्ये टाकून विशाखापट्टनम येथून देगलूर मार्गे उदगीर येथे आणला होता. आरोपीतांवरती संशय येवू नये म्हणून आरोपी हे तेलाचा टँकरचा उपयोग करत होते. त्यामुळे कुठल्याही नाकाबंदीमध्ये किंवा ईतर कार्यवाहीमध्ये त्यांचे वाहन पकडले जात नव्हते. नमुद टँकरचा चालक आरोपी अमोल गोरे याच्या सोबत सदर गुन्हयामध्ये लहू आलुरे, सचिन आलुरे, कैलास बेंडके सर्व रा वडवळ नागनाथ ता चाकुर जि लातुर असल्याचे निषन्न झाले. नमुद आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून आरोपी नामे लहू आलुरे, सचिन आलुरे, कैलास बेंडके सर्व रा वडवळ नागनाथ ता चाकुर जि लातुर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता.४) रोजी नमुद आरोपीस सकल चौकशी करता नमुद आरोपीताने त्याला या गुन्हया संदर्भाने माहिती देणे असल्याचे सांगितल्याने दोन शासकीय पंचासमक्ष निवेदन पंचनामा करण्यात आला. आरोपी अमोल गोरे याने सांगितले की, आम्ही दोन किलो गांजाचे पॉकेट घेवून सॅम्पल दाखवत असताना यातील अंदाजे ३०० किलो गांजा हा आम्ही एकूण चौदा पोत्यामध्ये भरून टँकरमध्ये भरून लपून ठेवले होते. नमुद टँकर हा हाकनकवाडी शेत शिवारामध्ये एका निर्जनस्थळी शाळेच्या पाठीमागे लावला होता. नमुद आरोपीच्या अटकेची माहिती ईतर आरोपीतांना मिळाल्यामुळे ते टँकर त्याच ठिकाणी लावून पळून गेले असल्याचे आरोपीताने सांगितले त्याप्रमाणे उदगीर ग्रामीण पोलीसांनी सर्व कायदेशिर प्रक्रिया अवलंबून आरोपी नामे अमोल गोरे याने डोंगरशेळकी शेत शिवारात उभा असलेला टँकर दाखविला.
पंचासमक्ष नमुद टँकरची पाहणी केली असता त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा (शेंडे, फुले, पाने, बिया मिश्रीत) असलेले एकूण चौदा पोते वजन ३०२ किलो असलेले किंमत अंदाजे ७५ लाख व एक लाल रंगाचे टँकर क्रमांक एम.एच.४६. ए.आर.०६५९ ज्याच्या पाठीमागे "धनगराची बानू" असे लिहीलेले किंमत अंदाजे ३२ लाख किंमतीचे टँकर मिळून आले. पंचासमक्ष नमुद अंमली पदार्थ गांजा व टँकर जप्त करण्यात आले. नमुद कार्यवाहीमध्ये आता पर्यंत एकूण ३०४ किलो गांजा किंमत अंदाजे ७५ लाख ५० हजार रुपये, एक हुंडाई कार किंमत अंदाजे २ लाख, एक टँकर किंमत अंदाजे ३२ लाख असे एकूण एक कोटी ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक श्री मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भिसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तारु, पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकत्ते, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, संतोष शिंदे, राहुल नागरगोजे, अंगद कोतवाड, नामदेव चेवले, महेबूब सय्यद, भिमाशंकर फुलारी, चालक अभिजित लोखंडे, प्रदीप घोरपडे, राम बनसोडे, निजामोद्दीन मोमीन, तुकाराम कज्जेवाड, अर्जुन तिडोळे, जुल्फेकार लष्करे, तांत्रिक सहाय्य पोलीस अंमलदार संतोष देवडे, गणेश साठे व होमगार्ड व्यंकट सुर्यवंशी, बालाजी सताळे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.