Udgir News sakal
मराठवाडा

Udgir News : उदगीरमध्ये दोन घरे फोडून १४ लाखांचा ऐवज लंपास;सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश

शहरातील निडेबन मार्गावरील ‘तुलसीधाम सोसायटी’ या उच्चभ्रू वस्तीमधील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास केला.

सकाळ वृत्तसेवा

उदगीर : शहरातील निडेबन मार्गावरील ‘तुलसीधाम सोसायटी’ या उच्चभ्रू वस्तीमधील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास केला.

ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निडेबन मार्गावरील तुलसीधाम सोसायटीत शुक्रवारी (ता. १४) मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. सोमेश्वर राचप्पा घाडे (वय ६८) व गोपाळ बाबूराव मनदुमले यांच्या घरांचे कुलूप चोरट्यांनी तोडले. दोघांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ७५ हजार सहाशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

सोमेश्वर राचप्पा घाडे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर तिघांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले. उपनिरीक्षक तानाजी चेरले तपास करीत आहेत. शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात चोरीच्या घटनांचे प्रमाण अलीकडे अत्यंत कमी झाले होते. या पार्श्वभमीवर या घरफोडीने खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT