उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा, लोहारा तालुक्यात मंगळवारी ( ता. १३ ) रात्री झालेल्या अतिवृष्टीने ४५ तलाव पूर्णपणे भरले आहेत.
मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाने उमरगा - लोहारा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अठरा तलाव शंभर टक्के भरले होते. परतीच्या पावसाचा कहर शेतीच्या नुकसानीला कारणीभूत ठरला मात्र पाणी साठ्यात मोठी वाढ झाली, त्यामुळे येणाऱ्या काळात ओलिताखालील क्षेत्र वाढू शकते शिवाय पाणीटंचाईचा प्रश्नही मिटणार आहे. उमरगा - लोहारा तालुक्यातील ४५ प्रकल्पापैकी उमरगा तालुक्यातील ३१ आणि लोहारा तालुक्यातील सर्वच अकरा प्रकल्प तुडुंब भरले आहेत.
उमरगा तालुक्यातील भरलेले तलाव पुढीलप्रमाणे : साठवण तलाव- नारंगवाडी, कोराळ, सुपतगाव, दाळींब, एकूरगा, बलसूर क्रमांक एक, बलसूर क्रमांक दोन, वागदरी, भिकार सांगवी, केसरजवळगा क्रमांक एक, केसरजवळगा क्रमांक दोन, भूसणी, कदेर, गुंजोटीवाडी, मूरळी, तलमोडवाडी, डिग्गी, रामनगर. सरोडी (८० टक्के), गुंजोटी (७४), कसगी (७९). लघू पाटबंधारे तलाव- पेठसांगवी, काळनिंबाळा, कोरेगाव, कोरेगाववाडी, आलूर. मध्यम प्रकल्प - जकापूर, बेन्नीतूरा, तूरोरी.
लोहारा तालुक्यातील भरलेले तलाव पुढीलप्रमाणे : साठवण तलाव - अचलेर, धानुरी, बेलवाडी, भोसगा, जेवळी क्रमांक एक, जेवळी क्रमांक दोन, माळेगाव, हिप्परगा रवा. लघू पाटबंधारे तलाव- अचलेर, धानुरी, हिप्परगा रवा.दरम्यान ४५ पैकी ४२ तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलाव परिसरातील व तलावातून विसर्ग होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह पिके वाहून गेली आहेत मात्र येणाऱ्या काळात पाणी साठ्याचा उपयोग शेतीसह, विविध गावाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उपयूक्त ठरणार आहे.
(संपादन-प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.