उमरगा, (जि. धाराशिव) - दोन टर्म धाराशिवचे खासदार होण्याची संधी मिळालेले शिवाजी बापू कांबळे यांनी अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मी दोन वेळा धाराशिवचा खासदार होतो. मी एक रुपयेचा भ्रष्टाचार केला नाही. मला पक्षश्रेष्टीने उमरगा - लोहारा मतदार संघात संपर्क करायला सांगितल्यामुळेच मी या मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहे अशी माहिती माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी (ता. २३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकिय विषयावर भाष्य केले.
या वेळी हिंदू खाटीक समाजाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, प्रकाश कांबळे, युवराज घोडके, गणेश घोडके, प्रभाकर पिस्के, अमर कोथिंबरे, संतोष कांबळे उपस्थित होते. श्री. कांबळे पुढे म्हणाले कि, पाच वर्षाच्या काळातील कुरघोडीचे राजकारण आत्तापर्यंत कधी झालेले नसेल.
आजच्या काळात लोकप्रतिनिधीनी ५० कोटी निधी आणला तर २५ कोटीची कामे होतात अन् २५ कोटी खिश्यात जातात अशी अवस्था आज झाली आहे. मतदार सर्व जाणून आहे. या मतदार संघाच्या रचनात्मक विकास कामासाठी मी इच्छुक उमेदवार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याने शिवसेनेचा धाराशिवचा दोन वेळा खासदार होण्याची संधी मिळाल्याने या भागातील नागरिक मला नावानीशी ओळखतात. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी तयारी करतोय. यावेळी हिंदू खाटीक महाराष्ट्र प्रदेशचे युवक सचिव आदर्श कोथिंबरे, आकाश कांबळे, किरण कांबळे, महेश कांबळे, सोमा कांबळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.