Osmanabad Crime esakal
मराठवाडा

उमरगा पोलिसांची धडक कारवाई, वाहनांसह २७ लाखांचा गुटखा पकडला

महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. उमरगा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन राष्ट्रीय महामार्गावर तलमोड टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा लावुन बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर  टेम्पोवर कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २२ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आले. आयशर टेम्पो किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकुण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात (Osmanabad) घेतला आहे. याबाबतची माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक निवा जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस नाईक चंद्रकांत गायकवाड, अतुल जाधव, लक्ष्मण शिंदे, सिध्देश्वर उंबरे बाबा कांबळे आदींच्या पथकाने तलमोड (Umarga Police) टोलनाक्यावर सापळा रचला. (Umarga Police Seized Along WIth 27 Lakh Rupees Osmanabad)

शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान आयशर टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात आर. के. या नावाचा गुटखा असलेली ४५ पोती आढळून आली. वाहन चालक लक्ष्मण रोहादास राऊत (वय २७, रा.अनाळा ता. परंडा ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुटख्याची मोजमाप व तपासणी करण्यात आली आहे. अन्न भेसळ विभागाला याबाबत कल्पना देण्यात आली असून त्यांच्या पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT