Unseasonal Rain in umarga tahsil sakal
मराठवाडा

Unseasonal Rain : उमरगा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाका

उमरगा शहर व ग्रामीण भागातील बहुतांश गाव, शिवारात गुरूवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

अविनाश काळे

उमरगा - उमरगा शहर व ग्रामीण भागातील बहुतांश गाव, शिवारात गुरूवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने  ऊस, उन्हाळी तूर, कांदा पिकासह आंब्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

उमरगा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासुन उन्हाची तीव्रता वाढली होती. यंदा पहिल्यांदाच गुरुवारी अवकाळी पाऊस झाला.   दुपारी साडेतीनपासून काही गावात सुरवात झाली होती.

तालुक्यातील नारंगवाडी, बाबळसुर, नाईचाकुर, मातोळा, एकूरगा, सावळसुर, बाबळसुर, वागदरी, त्रिकोळी, कुन्हाळी, कदमापुर, तुरोरी, तलमोड, बलसुर आदी भागात पावसाने तब्बल पाऊण तास झोडपल्याने ग्रामीण भागात नागरिकांची धांदल उडाली.

शेतशिवारातील आंब्यासह उन्हाळी तूर, कांद्यासह अन्य पिकांसह भाजीपाला, पपई, कलिंगड, हळद, व फळबागेचे मोठे नुकसान झाले. कांही शिवारात पाणी साचले होते. दरम्यान काढणीला आलेले कांदा पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. उघड्यावर असलेला कडबा भिजला. माडज शिवारातील विलास पाटील यांच्या शेतातील वादळी वाऱ्याने पत्र्याचे शेड उडाले.

सांयकाळी पुन्हा काही भागासह शहरात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सांयकाळी ढग भरून असल्यामुळे अधूनमधून पावसाची रिमझिम सुरूच होती. दरम्यान हिप्परगाराववाडी येथील मारुती यंपाळे यांची केसर आंब्याच्या आमराईत केैऱ्याचा सडा पडला होता. नाईचाकुर येथील राम  पवार यांच्या केसर आंब्याचे मोठे नुकसान झाले.

वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने कुन्हाळी शिवारातील पानमळे कोलडले आहेत. मुळज परिसरात घरावरील पत्रे उडाली, झाडे, सौर ऊर्जेचे खांब, शेतातील सौरऊर्जा संच उन्मळून पडल्याची माहिती सांगण्यात आली. वाऱ्यामुळे दुपारपासुन वीज गुल झाली होती. रात्रीही अधुनमधुन वीजेचा लंपडाव सुरू होता.

वीज पडून दोन जनावरे दगावली

उमरगा तालुक्यातील बेटजवळगा शिवारात वीज पडून तुकाराम शिंदे यांच्या मालकीच्या म्हैस दगावली तर दगडधानोरा शिवारात वीज पडून युवराज व्हनपाके यांच्या मालकीची गाय दगावली.

'अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा वाऱ्यामुळे ग्रामस्थांसह शिवारातील शेतकऱ्यांची धांदल उडाली. झाडे उन्मळून पडले आहेत, फळबागांचे नुकसान झाले आहे. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील गावे अंधारात होती.

- महेश शंकर पाटील, पोलिस पाटील एकूरगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT