file photo 
मराठवाडा

आता कोरोनापेक्षाही मोठे बेरोजगारीचे संकट !

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणू संसर्गापाठोपाठ आता सर्वात मोठी समस्या आहे ती बेरोजगारीची...! कारण पुणे - मुंबईसह इतर मोठ्या शहरांत कामानिमित्त गेलेले जवळपास ५० हजारांपेक्षाही जास्त नागरिक परत आले आहेत. त्यातील अनेकजणांची परत कामाच्या ठिकाणी जाण्याची मानसिकता तयारच झालेली नाही. त्यामुळे परभणीसारख्या मागासलेल्या शहरात किंवा जिल्ह्यासमोर आता बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करण्याची भीती आहे.
कोरोना विषाणू संसर्गानंतर देशात लॉकडाउन करण्यात आले. या परिस्थितीत देशातील सर्वच इंडस्ट्रीज बंद करण्यात आल्या. सलग तीन महिने सर्वकाही बंद असल्याने लाखो लोकांनी आपापली शहरे सोडली. हाताला काम नसल्याने उपाशी राहून जीवन जगण्यापेक्षा आपले गाव जवळ करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे अनेकजण सध्या आपापल्या मूळ गावी परतलेले आहेत. पहिले काही दिवस लॉकडाउनच्या घाईगडबडीत व कोरोनाच्या संसर्गाच्या चर्चेतच गेले. परंतु, आता खऱ्या अर्थाने परत आलेल्यांसमोर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. परभणी शहरात आज घडीला कोणताही मोठा उद्योग अस्थित्वात नाही. जे छोटे - मोठे उद्योग आहेत ते सध्या तरी बंद आहेत. त्यामुळे बाहेरगावांहून आपल्या गावी परतलेल्या अनेकांसमोर काम कसे मिळवायचे हा प्रश्न आहे.

हेही वाचा :​ मराठवाड्यातील ३३ तालुक्यांत पेरणीची घाई नको


मोठ्या शहरांतून आले आहेत ५० हजारांच्या वर लोक
पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरांत नोकरीनिमित्त गेलेले हजारोजण जिल्ह्यात परत आले आहेत. याचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात बेरोजगारांची फौजच उभी राहिली आहे. यातील काही जणांनी परत कामासाठी पुणे, मुंबई जवळ केली असली तरी सर्वाधिक टक्का हा परत जण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. कारण कोरोनाचा कहर पुणे व मुंबई या दोन शहरांत जास्तच असल्याने आगीतून निघून फुफाट्यात नको, अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

कुशल कामगारांचेही वांदेच
कोरोनामुळे व्यवसाय, कारखाने बंद पडल्याने अनेक कुशल कामगार परत आपापल्या जिल्ह्यात आले आहेत. त्यातील अनेकांना परत जाण्याची मनस्थिती नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हाताला काम देणारा कोणताही व्यवसाय सध्या परभणी जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे अकुशल कामगारांप्रमाणेच कुशल कामगारांनाही जिल्ह्यात बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. एकतर जिल्हा सोडून परत मोठ्या शहराकडे धाव घेणे किंवा पडेल ते काम कऱणे, हाच एकमेव पर्याय सध्या या कामगारांसमोर आहे.

हेही वाचा : नांदेड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

स्थानिक व्यावसायिकांच्याही अडचणींत वाढ
जिल्ह्याच्या गावात किंवा तालुकाच्या गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यात पहिल्या अनलॉकमध्ये काही व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची सूट दिली आहे. परंतु, अनेक व्यवसाय अद्यापही सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यात सलून, हॉटेल, चहाच्या टपऱ्या यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिलेली नसल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेकांना गेल्या तीन महिन्यांपासून उत्पन्नच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT